रायगड भाजपची सुत्रे प्रशांत ठाकूरांकडे
By Admin | Updated: January 16, 2016 00:35 IST2016-01-16T00:35:14+5:302016-01-16T00:35:14+5:30
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपवासीय झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पावधीतच पक्षाचा विश्वास संपादीत केल्याने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी

रायगड भाजपची सुत्रे प्रशांत ठाकूरांकडे
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपवासीय झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पावधीतच पक्षाचा विश्वास संपादीत केल्याने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असताना रायगड जिल्ह्यात मात्र पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षाला अपयश आले. या सगळयाचा विचार करून प्रदेश नेतृत्वाने जिल्हयात नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाध्यपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त भुषण पाटील, माळते अध्यक्ष बाळासाहेब पाटील उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी अरूण भगत
रामशेठ ठाकूर यांचे कट्टरसमर्थक अरूण भगत यांना तालुकाध्यक्षपद देण्यात आले आहे. शहरध्यक्षपद रिक्त असल्याने या ठिकाणी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.