निलोफरमुळे रायगडात सतर्कतेचा इशारा
By Admin | Updated: October 29, 2014 01:59 IST2014-10-29T01:59:28+5:302014-10-29T01:59:28+5:30
निलोफर चक्र ीवादळामुळे हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे.

निलोफरमुळे रायगडात सतर्कतेचा इशारा
अलिबाग : निलोफर चक्र ीवादळामुळे हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वादळी वा:यासह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्व विभागांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
नागरिकांनी आपत्ती काळात शासनास सहकार्य करावे, शासनाने दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिका:यांनी केले. आपत्तीकाळात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या दैनंदिन गरजांकडेही प्राधान्याने लक्ष द्यावे. अन्नधान्य, वैद्यकीय निकड, निवास याबाबत आधीपासून विचार करावा, असेही त्यांनी अधिका:यांना सांगितले.
रेवस, अलिबाग, मुरूड येथील मच्छीमार सोसायटय़ांद्वारे मासेमारीला गेलेल्या बांधवांना परत बोलविण्यात आले आहे. प्रवासी जलवाहतूक करणा:या कंपन्यांनाही लेखी सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. निलोफर चक्रीवादळाचे संकट पाहता या काळात पर्यटकांनी व स्थानिकांनी समुद्रकिना:यांवर फिरण्यास जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याबाबत संबंधित नगरपालिका, ग्रामपंचायतींही आपापल्या भागातील समुद्रकिनारी फलक लावून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)