भेसळयुक्त खाद्य तेलाच्या कारखान्यावर छापा, एपीएमसी मधील प्रकार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 15, 2023 20:07 IST2023-09-15T20:07:08+5:302023-09-15T20:07:21+5:30

पाम तेलाचा वापर करून ब्रँडच्या नावाने विक्री

Raid on adulterated edible oil factory, in APMC | भेसळयुक्त खाद्य तेलाच्या कारखान्यावर छापा, एपीएमसी मधील प्रकार

भेसळयुक्त खाद्य तेलाच्या कारखान्यावर छापा, एपीएमसी मधील प्रकार

नवी मुंबई : पाम तेलामध्ये वेगवेगळे रसायन मिसळून ब्रँडेड कंपन्यांच्या नावे शेंगतेल, राईचे तेल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. एपीएमसी मध्ये मागील काही महिन्यांपासून हा कारखाना चालवला जात होता. त्याठिकाणच्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

एपीएमसी आवारात गौतम ऍग्रो इंडिया नावाने तेल कारखाना चालवला जात होता. त्याठिकाणी पाम तेलात इतर रसायन मिसळून नामांकित ब्रँडचे शेंगतेल व राईचे तेल बनवले जात होते. याची माहिती अन्न व औषध प्रशासन तसेच गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार नुकतेच एपीएमसी मधील या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे पाम तेलात रसायन मिसळून बनवलेले शेंगतेल गुजरात, सोना व सौराष्ट्र या नावाने तर राईचे तेल केशव ब्रॅण्डच्या नावाने विकले जात होते.

यासाठी त्याठिकाणी मोठमोठ्या टाक्या बसवून कारखाना तयार करण्यात आला होता. त्यामद्ये बाहेरून मागवले पाम तेल ओतून त्यात वेगवेगळे रसायन मिश्रण करून ते डब्ब्यात भरले जात होते. यासाठी सुमारे २० कामगार दिवस रात्र त्याठिकाणी काम करत होते. एपीएमसी परिसरात तसेच विविध ठिकाणी विक्रीसाठी हे तेल पुरवले जात होते. मात्र हलक्या दर्जाच्या पाम तेलात रसायन मिसळून बनवलेल्या या तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे छापा टाकून तिथल्या तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याच्या अहवालानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अद्याप पर्यंत याप्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

Web Title: Raid on adulterated edible oil factory, in APMC