शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल पाटील याला पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात, विविध कलमान्वये गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 11:47 IST

...तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ओरडा केला.

नवीन पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्यात राहुल पाटील (राहणार आडवली ) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.ओवळे येथे 12 मार्च रोजी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीमध्ये राहुल पाटील व जयेश यांच्या वतीने सहभागी असलेल्या बैलगाड्यांची शर्यत झाली. त्यावेळी जयेश पाटील गटाची बैलगाडा जोडी विजयी झाल्यानंतर त्या बैलजोडीच्या चाहत्यांनी विजयी बैल जोडीसह फोटो काढून गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली.

तेव्हा यातील आरोपी राहुल पाटील याने बैलगाडा शर्यतीत हरल्याचा राग मनात धरून लोकांना जमवून विजयी बैलाचे समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव करुन आरडा ओरड केली. यावेळी राहुल पाटील याचे समर्थकांनी दगडफेक करून शिवीगाळी केली. तसेच जोरजोरात आरडा ओरडा केला. त्यातील चॉकलेटी रंगाचा फुल बाहयांचा शर्ट व जिन्स पॅन्ट घतलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या ताब्यातील अग्नीशस्त्राने बैलगाडा शर्यतीमध्ये जमलेल्या जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राउंड गोळीबार केला. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटील याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसpanvelपनवेल