शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

सिडकोने बांधलेल्या जुन्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 3:32 AM

वसाहतीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतींचा पुनर्विकास सिडको करेल किंवा त्यापैकी काही बांधकाम प्राधिकरणाला मिळावे, ही अट काढून टाकण्यात आली आहे.

पनवेल : वसाहतीतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या सिडकोच्या इमारतींचा पुनर्विकास सिडको करेल किंवा त्यापैकी काही बांधकाम प्राधिकरणाला मिळावे, ही अट काढून टाकण्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला आहे, त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा मार्ग सिडकोकडून मोकळा झाल्याची माहिती सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे सांगितले.सिडकोने सुरुवातीला कळंबोली आणि नवीन पनवेलमध्ये इमारती बांधल्या. त्या ठिकाणी स्वस्तात घरे रहिवाशांना दिली. मात्र, काही वर्षांत या इमारतींची दुरवस्था झाली. स्लॅब कोसळण्यापासून तर प्लॅस्टर निघणे यासारख्या असंख्य घटना कळंबोलीतील केएल-२ आणि खांदा वसाहतीतील ए टाइपच्या घरात घडत आहेत. यामध्ये काही रहिवासी जखमीही झालेले आहेत. कळंबोलीतील सिडको इमारतीचे स्ट्रक्चर आॅडिट करून काही इमारती धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या. या इमारतीचा पुनर्विकास करण्याकरिता शासनाने वाढीव एफएसआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच पुनर्विकास झाल्यामुळे या परिसरातील पायाभूत सुविधांवर काय परिणाम होईल याबाबत असेसमेंट करून तो अहवाल सादर करण्यात आला आहे.या इमारतीची जागा सिडकोच्या मालकीची असल्याने त्यांनी बांधलेल्या घरांपैकी काही घरे देण्याची अट घातली होती, त्याचबरोबर मोडकळीस आलेल्या या इमारतींचा विकास सिडकोच करणार असल्याचा मुद्दाही पुढे आला होता. पुनर्विकाच्या आड येणाऱ्या या अटी काढून टाकण्यात याव्यात, अशा सूचना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्राधिकरणाला केल्या होत्या. नुकत्याच पार पडलेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. तशा अशायचा ठरावही करण्यात आल्याचे सिडको अध्यक्षांनी कळंबोलीत प्रभाग क्र मांक १० येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी जाहीर केले.सिडकोच्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न दीर्घकाल प्रलंबित होता. आता सिडकोला जागाही नको आणि बांधकामातील हिस्साही नको. ती अट काढून टाकण्यात आली आहे. हे काम खासगी विकासक करू शकतात. त्यांनी फक्त सिडकोला नियमानुसार शुल्क भरणे बंधनकारक आहे. शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष विकास करता येईल.- आमदार प्रशांत ठाकूर,अध्यक्ष, सिडको

टॅग्स :cidcoसिडको