दिवाळीत दुचाकी, चारचाकीची खरेदी वाढली
By Admin | Updated: November 14, 2015 02:03 IST2015-11-14T02:03:33+5:302015-11-14T02:03:33+5:30
दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पनवेलच्या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती

दिवाळीत दुचाकी, चारचाकीची खरेदी वाढली
प्रशांत शेडगे , पनवेल
दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी व चारचाकी वाहनांसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून पनवेलच्या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, महागाई, मंदीचे सावट, बेकायदा बांधकाम, नैना प्राधिकरण या सगळ्या गोष्टींमुळे घरखरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. ईएमआयवर आता वस्तू मिळत असल्याने,
मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी नोकरवर्गाकडून दुचाकी व चारचाकीची खरेदीसाठी बुकिंग करण्यात आली आहे. शहरातील तीन शोरूमधून दोन हजारांपेक्षा जास्त दुचाकींची विक्री झाली असल्याचे डिलरकडून सांगण्यात आले.
विशेष करून अॅक्टिवा गाड्यांना जास्त मागणी असल्याचे आढळून आले. दुचाकीसोबतच चारचाकी वाहनांची विक्रीदेखील तेजीत
आहे.
व्यापारी, व्यावसायिक व नोकरदार यांच्याकडून चारचाकीच्या खरेदीला प्राधान्य दिले गेले. काही ठिकाणी गेल्या दीड महिन्यापूर्वी गाड्या बुक करण्यात आल्या
होत्या.
मारुतीच्या गाड्या पनवेलमध्ये सर्वाधिक विक्री होत असल्याचे सिमरण मोटर्सचे कार्यकारी संचालक कोहली यांनी सांगितले.
पूर्वी बुकिंग केलेल्या ग्राहकांना बुधवारी शोरूममधून चारचाकी वाहनांचा ताबा देण्यात आला. त्याचबरोबर काही ग्राहक गुरुवारी वाहन पूजण्याकरिता घेऊन जाणार आहेत. यामुळे यंदा दिवाळीत मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केली.
यामुळे शोरूमवाल्यांची चांदी झाली आहे. मंदी असली, तरी ग्राहकांनी वाहन खरेदी कमी केली नाही, त्यामुळे चारचाकी, दुचाकी वाहनांच्या खरेदीवर याचा परिणाम दिसून आला नाही.