एसआरटी पध्दतीने शेतीत बारीक तांदूळ पिकवावा

By Admin | Updated: October 17, 2014 22:45 IST2014-10-17T22:45:46+5:302014-10-17T22:45:46+5:30

भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो,

Purchase fine rice in the farm in SRT mode | एसआरटी पध्दतीने शेतीत बारीक तांदूळ पिकवावा

एसआरटी पध्दतीने शेतीत बारीक तांदूळ पिकवावा

कर्जत : भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो, त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक - खाजगी भागीदारीतून आता एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून बारीक आकार असलेले तांदूळ पिकविण्याकडे शेतक:यांनी आपला कल ठेवावा,असे आवाहन राज्याचे कृषी विभागाचे भात पीक समन्वयक विजय कोलेकर यांनी शेतकरी मेळाव्यात केले.  राज्याच्या कृषी विभागाने प्रथमच सुरु  केलेल्या सार्वजनिक खाजगी भागीदार म्हणजे पीपीपी,याला भातपिकासाठी सगुणा राईस तंत्र म्हणजे एसआरटीचा प्रसार होण्यासाठी पुढाकार शासन घेत आहे. कर्जत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात एसआरटीचा अवलंब शेतक:यांनी केला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी कृषी आयुक्त विभागाने एसआरटी पध्दतीने भात लागवडीच्या माहितीसाठी नेरळजवळील सगुणाबाग येथे शेतकरी मेळावा आयोजिला होता. यावेळी रायगड, ठाणो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात एसआरटी पध्दतीने शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.
भाताची मळणी कशी होते,याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. यावेळी यशवंत गायकर, हरिश्चंद्र ठोंबरे, रवींद्र झांजे या कर्जत तालुक्यातील शेतक:यांसह मुरबाड येथील दत्तात्रय टोहके आणि आदिवासी शेतकरी परशुराम आगिवले, कृषी चित्रकार सोपान खाडे यांचा सगुणाबागच्यावतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
 
4एसआरटीमुळे शासनाचे सार्वजनिक, खाजगी भागीदार झाले आहेत, त्यांना राज्याच्या कृषी विभागामार्फत मदत केली जात आहे. ही मदत पन्नास टक्के अनुदानाने मिळणार असून भात मळणी यंत्रचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. पंजाब राज्यात भात मळणीसाठी उपयोगात येणारे तंत्रही शासनाने माहितीसाठी उपलब्ध केले 

 

Web Title: Purchase fine rice in the farm in SRT mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.