शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

गणेशोत्सवामधून महिला सुरक्षेविषयी जनजागृती

By admin | Updated: September 15, 2016 02:36 IST

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी लोकमत प्रस्तुत आपले बाप्पा व सखी मंचने महिला सुरक्षेविषयी जनजागृती मोहीम राबविली.

नवी मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी लोकमत प्रस्तुत आपले बाप्पा व सखी मंचने महिला सुरक्षेविषयी जनजागृती मोहीम राबविली. यानिमित्ताने सानपाडा व जुईनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महिलांनी सुरक्षेसाठी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. सानपाडाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने १२ सप्टेंबरला विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज दायमा यांनी यावेळी महिला सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. महिलांनी स्वत:ची सुरक्षा स्वत: करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे. सोनसाखळी चोरीच्या घटना अनेक वेळा घडत असतात. या घटना होवू नयेत यासाठी दक्षता घेतली पाहिजे. घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये अनेक वेळा महिलाच महिलांच्या छळास कारणीभूत असतात. हे प्रकार थांबविले पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षास माहिती द्यावी. महिलांच्या मदतीसाठी प्रतिसाद अ‍ॅप्स असून त्याचाही उपयोग करावा, असे आवाहन केले. यावेळी सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा होडगे, मंडळाचे अध्यक्ष भाऊ भापकर, कार्याध्यक्ष अजित सावंत, गणपत वाफारे, महेश बनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. जुईनगर सेक्टर २५ मधील भारत सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये भारत संस्कृती महिला मंडळानेही जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ यांनी मार्गदर्शन केले. एटीएममधून पैसे काढताना खबरदारी घ्यावी. पीन नंबर टाकताना दुसरा हात बटनांच्या वरती धरावा. पैसे काढताना दुसरी व्यक्ती एटीएम सेंटरमध्ये येवू देवू नये अशा प्रकारच्या सूचना केल्या. मोबाइल, सोशल मीडियामधून महिलांविषयी चुकीचे संदेश पाठविण्याचे प्रकार घडत असतात. अनेक वेळा शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी महिलांची छेड काढली जाते किंवा पाठलाग केला जातो. अशा प्रकारची कोणतीही गोष्ट निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी लोकमत सखी मंचच्या वतीने मोदक स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये भाग्यश्री जाधव, रून्नू पाणिग्रही, नीलम वळवईकर यांचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आला. परीक्षक म्हणून स्वाती वाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रमास भारत तरुण मित्र मंडळाचे सचिव रणजित उल्मेक, सोसायटीचे खजिनदार प्रवीण होवाळ, भारत सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रीती गोळपकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.