पं. राम मराठे संगीत महोत्सव उद्यापासून
By Admin | Updated: October 31, 2014 23:02 IST2014-10-31T23:02:03+5:302014-10-31T23:02:03+5:30
संतूर वादक राहुल शर्मा, पं. सुरेश बापट यांच्यासह अनेक नामवंतांच्या सहभागाने यावर्षीचा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोह सजणार आहे.

पं. राम मराठे संगीत महोत्सव उद्यापासून
ठाणो : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया, प्रसिद्घ सनई वादक कल्याण अपार, संतूर वादक राहुल शर्मा, पं. सुरेश बापट यांच्यासह अनेक नामवंतांच्या सहभागाने यावर्षीचा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोह सजणार आहे.
ठाणो महानगरपालिकेच्यावतीने आणि अ.भा. नाटय परिषदेच्या सहकार्याने 2 नोव्हेंबरपासून 21 व्या पं. राम मराठे संगीत समारोहास प्रारंभ होणार आहे. या संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन शिवसेना ठाणो जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, आगामी नाटय़ संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा ज्येष्ठ अभिनेत्री, गायिका फैय्याज, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, अॅड़ निरंजन डावखरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या संगीत स्मृती समारोहाचे पहिले पुष्प गायिका श्रद्घा जैन व प्रसिद्घ संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र प्रसिद्घ संतूर वादक राहुल शर्मा गुंफणार असून, त्यांना तबला साथ करणार आहेत मुकुंदराज देव. दुस:या दिवशी सं. मंदारमाला नाटकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘सुवर्ण मंदार’ हा नाटय़संगीताचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना मुकुंद मराठे, निवेदन धनश्री लेले यांचे असून गायक ज्ञानेश पेंढारकर, संजय मराठे, संजीव मेहेंदळे, प्राजक्ता मराठे आणि रजनी जोशी वैशिष्टय़पूर्ण नाटय़पदे सादर करणार आहेत.
संगीत राज्य नाटय़स्पर्धेतील विजेती नाटय़कृती ‘संगीत संशयकल्लोळ’ या प्रसिद्घ नाटकाने महोत्सवाचा तिसरा दिवस सजणार आहे. तर रात्रीच्या सत्रमध्ये मधुरा करंबेळकर यांचे सतार वादन ठेवण्यात आले आहे. प्रसिद्घ गायक पं. सुरेश बापट यांच्या गायनाने या दिवसाच्या सत्रचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)
एकापेक्षा एक सरस कलांचा आस्वाद विनामूल्य
4या समारोहाच्या चौथ्या दिवशी ‘सिंगारमणी’ किताब प्राप्त प्रसिद्घ नृत्यांगना सरिता काळेले यांचे कथ्थक नृत्य सादर होणार आहे. त्यानंतर तरुण गायिका सूरश्री जोशी व वीणा सावले यांच्या गायनाने दिवसाच्या शेवटच्या सत्रचा समारोप होणार आहे.
4या समारोहाचा समारोप प्रसिद्घ सनई वादक कल्याण अपार यांच्या सनई वादनाने व आंतरराष्ट्रीय किर्तीचे बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे.
4हा महोत्सव सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून या समारोहाचा ठाणोकर नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संजय मोरे यांनी केले आहे.