परप्रांतीय नागरिकास अटक

By Admin | Updated: June 2, 2017 05:54 IST2017-06-02T05:54:47+5:302017-06-02T05:54:47+5:30

सीबीडी रेतीबंदर परिसरामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या चंद्रप्रकाश त्रिपाठी याला पोलिसांनी

Protestant citizens arrested | परप्रांतीय नागरिकास अटक

परप्रांतीय नागरिकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सीबीडी रेतीबंदर परिसरामध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या चंद्रप्रकाश त्रिपाठी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्रिपाठी मूळ उत्तरप्रदेशमधील रहिवासी असून त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत.
रेतीबंदर परिसरामध्ये एक व्यक्ती शस्त्रविक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जगवेंद्र राजपूत व उपनिरीक्षक स्वप्निल वाघमारे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून चंद्रप्रकाश त्रिपाठी याला पोलिसांनी अटक केली. मूळ उत्तरप्रदेशचा असलेला त्रिपाठी टिटवाळा येथील आनंदनगर सोसायटीत रहात आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीमध्ये अजून कोणाचा समावेश आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Protestant citizens arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.