शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

आयुषचा देशासह जगभरात प्रचार वाढतोय - श्रीपाद नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:10 AM

आयुष या उपक्र माचे मागील ५ वर्षात १00 हून अधिक कार्यक्र म झाले असून या क्षेत्रात सहभागी झालेले सर्व घटक श्रद्धेने, निष्ठेने काम करीत असल्याचे नाईक म्हणाले.

नवी मुंबई : आयुष पद्धती लोकांसमोर नेल्याने आजवर खूप फायदा झाला आहे. नवनवीन रिसर्चमुळे आयुष्य खूप पुढे गेले आहे. आयुषबाबतचे १४ देशांशी करार झाले असून आणखी देशांबरोबर करार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगत आयुषचा जगभरात प्रचार आणि प्रसार वाढत असल्याची माहिती केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. वाशी प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य २0१९ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.आयुष या उपक्र माचे मागील ५ वर्षात १00 हून अधिक कार्यक्र म झाले असून या क्षेत्रात सहभागी झालेले सर्व घटक श्रद्धेने, निष्ठेने काम करीत असल्याचे नाईक म्हणाले. आयुष ही पॅथी जगाचे कल्याण करणारी असून आयुष जगात सर्वांपर्यंत न्यायचे असल्याचे त्यांनी सांगितले. सिडको अध्यक्ष तथा आयोजन कमिटीचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी देशाचा अमूल्य ठेवा जगभरापर्यंत नेण्यासाठी या कार्यक्र माचे आयोजन केले असल्याचे सांगत अ‍ॅलोपॅथीच्या माध्यमातून जे शक्य नव्हते ते आयुर्वेदच्या माध्यमातून साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. २0१४ साली आयुष मंत्रालयाची स्थापना झाली तेव्हापासून नागरिकांमध्ये देखील आयुषबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजन कमिटीचे सचिव डॉ. विष्णू बावणे यांनी या कार्यक्र माचा हेतू विशद करीत रु ग्ण, शास्त्र आणि राष्ट्रासाठी या कार्यक्र माच्या माध्यमातून एकत्र आलो असल्याचे सांगितले. २२ ते २५ आॅगस्ट या चार दिवस आयोजित केलेल्या या आयुर्वेद, युनानी होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीविषयी ५0 पेक्षा अधिक कार्यशाळा, १0 परिसंवाद तसेच सामान्य नागरिकांसाठी आरोग्यविषयक प्रदर्शनाचे मोफत महाआरोग्य शिबिराचे व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या चर्चासत्रात शेतकरी व औषधी वनस्पती, व्यापारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्र माच्या उद्घाटनप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळ, श्रीराम सावरीकर, डॉ. धनाजी बागल, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ आदी मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई