शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगती पत्रकावर राहणार ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 1:01 AM

कोरोनामुळे शासनाचा निर्णय : नवी मुंबईत विद्यार्थ्यांना दिलासा

योगेश पिंगळे

नवी मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० -२१ या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात कोविड १९ अपवादात्मक परिस्थितीमुळे पहिली ते आठवीच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार वर्गोन्नतबाबत मार्गदर्शक सूचना असलेला निर्णय शासनाने जाहीर केला असून पहिली ते चैथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपुस्तकावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख करण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने गेल्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा एकही दिवस प्रत्यक्षात भरली नाही. गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने थेट आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा आदेश काढल्यावर ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांच्याबाबतीत देखील हाच निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणार असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर काय नोंद असेल याची विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील उत्सुकता लागली होती. परंतु शिक्षण विभागाने याबाबत लेखी आदेश काढून इतर कोणताही शेरा देण्याऐवजी आरटीई कायद्यानुसार ‘वर्गोन्नत’ शेरा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांनीदेखील सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

प्रगतिपत्रकच बदलणारकोरोनामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू न झाल्याने यावर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रावर ‘वर्गोन्नत’ असा उल्लेख राहणार आहे त्यामुळे यावर्षी उपस्थित दिवस, उंची, वजन, श्रेणी हा कोणताही उल्लेख असणार नाही

नवी मुंबई शहरातील महापालिका, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या -

शाळा सुरू नसल्याने गेले वर्षभर शाळा, नवीन वर्ग पाहिलाच नाही. शाळा लवकर सुरू झाल्या पाहिजेत, घरी अभ्यास करून कंटाळा आला आहे.- साई शेवाळे (विद्यार्थी)

शाळेत मित्रांसोबत जाऊन शिकण्याची खूप इच्छा होती. परंतु शाळा सुरू झाल्याच नाहीत. ऑनलाइन शिक्षणाच्या निमित्ताने मित्रांना पाहू शकलो, परंतु प्रत्यक्षात भेट झाली नाही. आता शाळेतील नवीन वर्गात प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेण्याची खूप इच्छा आहेत.- गायत्री पिंगळे (विद्यार्थिनी)

कोरोनामुळे शाळा सुरू झाल्या नाहीत परंतु ऑनलाइन अभ्यास सुरू होता. ऑनलाइन अभ्यासापेक्षा शाळा सुरू असलेली चांगली. शाळा सुरू नसल्याने मित्रमैत्रिणीदेखील भेटले नाहीत. घरी फार कंटाळा आला आहे.  - विराज पाटील (विद्यार्थी)

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना वर्गोन्नत शेरा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.- योगेश कडुसकर, शिक्षणाधिकारी, न. मुं.म.पा. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसSchoolशाळा