वाशीतील वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 02:18 IST2019-08-01T02:18:46+5:302019-08-01T02:18:48+5:30

वाशी पोलिसांची कारवाई : पार्लरमालकासह तीन महिलांवर गुन्हा दाखल

Print out the brothel at Vashi | वाशीतील वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा

वाशीतील वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा

नवी मुंबई : मसाज पार्लरच्या नावाखाली वाशीत चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. बनावट ग्राहकाद्वारे सापळा रचून गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात पार्लरमालकासह तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी सेक्टर ३० ए येथील इन्फोटेक पार्कच्या तळमजल्यावरील ब्ल्यू डायमंड क्रिस्टल स्पा अ‍ॅण्ड सलूनमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने मंगळवारी छापा टाकून त्यावर कारवाई केली. त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवला असता, तिथे वेश्याव्यवसायासाठी महिला पुरवल्या जात असल्याचे उघड झाले. तर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यावेळी महिला अश्लील कृत्य करतानाही आढळून आल्या. यानुसार मसाज पार्लर मालक बापुराव देवराम जाधव याच्यासह तीन महिलांवर वाशी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पार्लरमध्ये काम करणाºया महिलांकडूनच त्या ठिकाणी देहविक्री केली जात होती. वाशीतील सतत गजबजलेल्या परिसरात हा मसाज पार्लर सुरू करून त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत होता. यापूर्वीही परिसरातील अशा वेश्याव्यवसायाच्या ठिकाणांवर पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. त्यानंतरही मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना चालत असल्याचे प्रकार उघड होत आहेत.
 

Web Title: Print out the brothel at Vashi