शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यासह भाजीपाल्याचे दर नियंत्रणात, एपीएमसीमध्ये आवक वाढली : कोबी, टोमॅटो सामान्यांच्या आवाक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 11:37 IST

vegetables : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटासह भाजीपाल्याची आवक वाढल्याने बाजारभाव घसरू लागले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही भाजीपाल्याचे दर सामान्य नागरिकांच्या आवाक्यात आले आहेत. टोमॅटो ३० रुपये व कोबीसह दुधी भोपळा ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मंगळवारी तब्बल ६०४ वाहनांमधून २,७६० टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. आवक समाधानकारक झाली असल्यामुळे सर्वच  वस्तूंचे दर कमी झाले आहेत. शेवगा शेंग व वाटाणा वगळता सर्वच  भाज्यांचे दर शंभरीच्या आतमध्ये आले आहेत. कांदा व बटाट्याचे दरही नियंत्रणात आले असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये कांदा २० ते ३१ रुपये किलो दराने विकला जात होता. मंगळवारी हे दर १५ ते २६ रुपयांवर आले आहेत. बटाट्याचे दर १५ ते २५ वरून १४ ते २२ रुपयांवर आले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ४० व बटाटा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. कांदा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले की, चाळीमधील कांदा शेतकऱ्यांनी विकायला काढला आहे. यामुळे आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. एक हजार टनपेक्षा जास्त कांदा व बटाटा विक्रीसाठी येत असल्यामुळे दर नियंत्रणात आले आहेत. 

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई