शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

दबावतंत्र; ‘एबी फॉर्म’विना अपक्ष उमेदवारीचा फार्स; गॉड फादरच्या मदतीने पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्याची खेळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 09:42 IST

...यामुळे मतदारांत अमक्याने तमक्या पक्षाकडून अर्ज भरला, असे वातावरण तयार झाले आहे; परंतु ‘एबी फॉर्मशिवाय या अर्जांना अर्थ नसला तरी संबंधित इच्छुकांचा आपल्या गॉड फादरच्या मान्यतेने हा एक दबावतंत्राचा फार्स असल्याची चर्चा आहे.

नारायण जाधव -

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी महायुती वा महाविकास आघाडी यापैकी सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत नवी मुंबईसह पनवेलमध्ये कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. तरीदेखील दोन्ही शहरांत अनेक माजी नगरसेवकांसह विविध पक्षांच्या पदाधिकारी, त्यांच्या नातेवाइकांनी आपापले नामांकन अर्ज  निवडणूक अधिकाऱ्यांकडे भरले आहेत. यामुळे मतदारांत अमक्याने तमक्या पक्षाकडून अर्ज भरला, असे वातावरण तयार झाले आहे; परंतु ‘एबी फॉर्मशिवाय या अर्जांना अर्थ नसला तरी संबंधित इच्छुकांचा आपल्या गॉड फादरच्या मान्यतेने हा एक दबावतंत्राचा फार्स असल्याची चर्चा आहे.

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये शिंदेसेना आणि भाजपची महायुती फिसकटल्यात जमा आहे, तर महाविकास आघाडी एकत्र लढणार  असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोणत्या पक्षाने कोणत्या जागा लढायच्या याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. सर्वच पक्षात इच्छुकांची  संख्या मोठी आहे. नवी मुंबईत १११ जागांसाठी अडीच हजारांवर इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत, तर अडीच हजारांवर जणांनी नामांकन अर्ज विकत घेतले आहेत. यातील अनेकांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करून आपले नामांकन अर्ज भरले आहेत.  ‘एबी फॉर्म नसताना कसे काय अर्ज भरले याची चर्चा सुरू आहे; परंतु पक्षश्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी खेळलेली ही एक खेळी असल्याचे यामागे सांगण्यात येत आहे. कारण मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होण्याआधीपर्यंत आता नामांकन अर्ज भरलेले उमेदवार आपला ‘एबी फॉर्म जमा करू शकतात.

यांनी भरला अर्ज एका घरात दोनहून अधिक तिकिटे हवे असलेले उमेदवार, आमदार, पक्षाचे पदाधिकारी यांचे नातेवाईक असलेले इच्छुकांनी प्रामुख्याने  साेमवारी पनवेल, नवी मुंबईतून नामांकन अर्ज भरले आहेत. काही जण मंगळवारी भरण्याच्या तयारी आहेत. जेणेकरून ‘एबी फॉर्मसाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणता येईल. अर्ज भरणाऱ्यांमध्ये शिंदेसेना आणि भाजप, उद्धवसेना, तसेच शेकापच्या इच्छुकांचा जास्त भरणा  असल्याची चर्चा आहे.

अनेकांचे दोन-दोन अर्जनियम ओळखून अनेकांनी  दोन दोन अर्ज भरले आहेत. यात एक अर्ज अपक्ष म्हणून तर एक पक्षाकडून भरला आहे. यात पक्षाने ‘एबी फॉर्म दिला नाहीतर आम्ही बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी लढू शकतो, असा दबाव आणण्याची काहींची खेळी आहे. यासाठी काहींना संबंधित गॉड फादरचीसुद्धा मूकसंमती असल्याचे सांगतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Pressure Tactics: Independent Candidacy Farce, Godfathers Leverage Party Leadership

Web Summary : Without official lists, Navi Mumbai and Panvel see nomination filings. Candidates use 'AB form' absence to pressure parties via godfathers, hinting at potential rebellion if tickets aren't granted, creating pre-election suspense.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Politicsराजकारण