Preparation for Navi Mumbai municipal elections | नवी मुंबई पालिका निवडणुकीची तयारी
नवी मुंबई पालिका निवडणुकीची तयारी

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. प्रशासकीय खर्चासाठी १६ कोटी ३२ लाख रुपयांची अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली असून, या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांची मुदत ७ मे २०२० ला संपत आहे. त्यापूर्वी निवडणुका घेण्यात येणार असून त्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या वर्षी पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने प्रभाग असणार आहेत. एक प्रभागामध्ये तीन किंवा पाच सदस्य असणार आहेत. यासाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरू करावे लागणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी लागणाऱ्या खर्चास सर्वसाधारण सभेची मंजुरी करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शासनाच्या या पूर्वीच्या आदेशाप्रमाणे एका मतदान केंद्रावर ७५० ते ८०० मतदार संख्या असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनपा क्षेत्रामधील ऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये आठ लाख ४७ हजार इतके मतदार असून, ८१९ मतदान केंद्र होती. मनपा निवडणुकीमध्ये जवळपास आठ लाख ५० हजार मतदार असण्याची शक्यता असून मतदान केंद्रांची संख्या ११०० होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी २०१७ मध्ये ठाणे महापालिकेची बहु-सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीमध्ये ३३ प्रभाग होते. १२ लाख २८ हजार ६०६ मतदारांची नोंद झाली होती. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिमतदार ९७ रुपये खर्च झाला होता. एकूण खर्च ११ कोटी ९५ लाख झाला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये पनवेलमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये २० प्रभाग होते. चार लाख २५ हजार ४५३ मतदारांची नोंद झाली होती. या निवडणुकीमध्ये प्रतिव्यक्ती १५० रुपये खर्च झाला होता. संपूर्ण निवडणुकीसाठी सहा लाख ३७ हजार रुपये ेखर्च झाला होता.

Web Title: Preparation for Navi Mumbai municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.