गरोदर महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: April 28, 2017 00:36 IST2017-04-28T00:36:47+5:302017-04-28T00:36:47+5:30
ऐरोली येथे राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. तिला दोन वर्षांची मुलगी असून पुन्हा गरोदर होती.

गरोदर महिलेची आत्महत्या
नवी मुंबई : ऐरोली येथे राहणाऱ्या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. तिला दोन वर्षांची मुलगी असून पुन्हा गरोदर होती.
दीपाली रत्नदीप हाटे असे मयत महिलेचे नाव आहे. पती रत्नदीप व दोन वर्षांच्या मुलीसह ती ऐरोली सेक्टर २ येथे राहत होती. रत्नदीप पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनावर कार्यरत आहेत. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कारकुड यांनी सांगितले. आत्महत्येचे नक्की कारण काय, यामागे गर्भलिंग चाचणीचे कारण आहे का याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.