नवी मुंबईत गर्भवती महिलेची आत्महत्या
By Admin | Updated: April 27, 2017 15:43 IST2017-04-27T15:43:28+5:302017-04-27T15:43:28+5:30
ऐरोली येथे राहणा-या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

नवी मुंबईत गर्भवती महिलेची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 27 - ऐरोली येथे राहणा-या 23 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. आत्महत्या केलेली महिला 9 महिन्यांची गर्भवती होती. या महिलेला 2 वर्षांची मुलगीदेखील होती.
दीपाली रत्नदीप हाटे (23) असे मृत महिलेचे नाव आहे. पती रत्नदीप व दोन वर्षांच्या मुलीसह ती ऐरोली सेक्टर 2 येथे राहायला आली होती. रत्नदीप पालिकेच्या घंटा गाडीवर सफाई कामगार आहे.
बुधवारी मध्यरात्री मिलगी रडत असल्याने पतीला जाग आली असता पत्नीने आत्महत्या केल्याचे त्याला आढळून आले. मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक बी. एस. कारकुड यांनी सांगितले.
दरम्यान गर्भवतीच्या आत्महत्येमागे गर्भलिंग चाचणीचे कारण आहे का? या दिशेनंही पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.