आत्महत्येपूर्वी घेतले भुलीचे इंजेक्शन

By Admin | Updated: November 23, 2014 01:16 IST2014-11-23T01:16:46+5:302014-11-23T01:16:46+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वसतिगृहातील शिकाऊ परिचारिका पूनम खरात हिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातपायांवर इंजेक्शन टोचून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

Pregnancy injection before suicide | आत्महत्येपूर्वी घेतले भुलीचे इंजेक्शन

आत्महत्येपूर्वी घेतले भुलीचे इंजेक्शन

ठाणो : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वसतिगृहातील शिकाऊ परिचारिका पूनम खरात हिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातपायांवर इंजेक्शन टोचून घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच ही आत्महत्या की हत्या, हे स्पष्ट होईल. याप्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
वागळे इस्टेट येथे राहणा:या पूनमने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. तिने आत्महत्या केलेल्या ठिकाणी भूल देण्याचे औषध असलेल्या ‘लिग्नोकेल’ इंजेक्शनची बाटली आणि काही सुया पोलिसांना सापडल्या आहेत़ 
तिने आत्महत्या करण्यापूर्वी डाव्या हातावर व दोन्ही पायांवर भुलीचे इंजेक्शन घेतले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला़ तसेच घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. त्यामुळे ही आत्महत्या आहे, की हत्या, हे अहवाल आल्यानंतरच उघड होईल, अशी माहिती ठाणो नगर पोलिसांनी दिली. 
या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी 
दिली. (प्रतिनिधी) 

 

Web Title: Pregnancy injection before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.