श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद
By योगेश पिंगळे | Updated: January 17, 2024 17:11 IST2024-01-17T17:10:47+5:302024-01-17T17:11:13+5:30
प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत.

श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद
योगेश पिंगळे,नवी मुंबई : अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी भव्य श्री राम मंदिरात श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त माजी खासदार संजीव नाईक यांच्यातर्फे नवी मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदरमधील सर्व मंदिरांमध्ये महाप्रसाद म्हणून २५००० किलो लाडू वाटप करण्यात येणार आहेत. हे प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत.
प्रसादाचे लाडू बनवण्याच्या शुभारंभप्रसंगी माजी खासदार नाईक, भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, रुद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सिंग, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, साईनाथ सेवा समितीचे संस्थापक- अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्यकारी-अध्यक्ष मंगेश नईबागकर, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ उपक्रमाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक मंगेश नईबागकर, सचिव सुरेश महाडिक, विश्वस्त प्रवीण रोठे आदी मान्यवर उपस्थित होते. हा रामप्रसाद तयार करण्यामध्ये संजीव नाईक मित्रमंडळ, रुद्र प्रतिष्ठानसह अन्य संस्था सहभागी झाल्या आहेत.