शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 23:42 IST

भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

नवी मुंबई : भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही टीका करून आमच्या विचारांचे सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात पाठविण्याचा इशारा दिला.वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात भारतीय बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यास प्रचंड गर्दी जमल्यामुळे हजारो कार्यकर्ते नाट्यगृहाबाहेर सभा संपेपर्यंत उभे होते. प्रकाश आंबेडकर यांनी धर्माचे राज्य आणि संकल्पनेमध्ये अडकून राहू नका. सत्तेवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे सरकार फसवे आहे. लुटारूंचे आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत बँकांचे करोडो रुपयांची कर्जे काढून परदेशात पळून जाणाऱ्या दरोडेखोरांची हे सरकार पाठराखण करीत असल्याची घणाघाती टीका आंबेडकर यांनी या वेळी केली. राफेल विमान खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली. आमच्या विचारांचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम रामदास आठवले यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.नोटाबदलीचा निर्णय कोणत्या कॅबिनेटमध्ये झालाय, हे त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला सांगितले पाहिजे. त्यामुळे अधिकार नरेंद्र मोदींना हा अधिकार कुणी दिला. असाही सवाल त्यांनी केला. संभाजी भिडे गुरुजी, शरद पवार, महादेव जानकर, रामदास आठवले, उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यावर सडकून टीका केली. विचारवंत लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, अमोल पांढरे, बापूसाहेब वाटकर, बहुजन वंचित आघाडीचे संघटक महादेव अर्जुन, भारिप बहुजन महासंघाचे हणमंत वाकशे, अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे खाजा मियाँ पटेल आदी उपस्थित होते.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNavi Mumbaiनवी मुंबई