कोपरखैरणेच्या उद्यानात अश्लील चाळे
By Admin | Updated: October 31, 2015 00:13 IST2015-10-31T00:13:56+5:302015-10-31T00:13:56+5:30
कोपरखैरणे येथील उद्यानात सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांच्या प्रकाराने लगतचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. यामुळे महिला व मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून

कोपरखैरणेच्या उद्यानात अश्लील चाळे
नवी मुंबई : कोपरखैरणे येथील उद्यानात सुरू असलेल्या अश्लील चाळ्यांच्या प्रकाराने लगतचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. यामुळे महिला व मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असून, सदर प्रकार थांबवण्याची मागणी होत आहे.
कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८ च्या मध्यभागी असलेल्या अण्णासाहेब पाटील उद्यानात अश्लील प्रकार होत आहेत. देहविक्री करणाऱ्या काही तरुणी रात्रीच्या वेळी अंधाराचा गैरफायदा घेत उद्यानातच गैरप्रकार करतात. यापूर्वी अशा काही तरुणींना उद्यानालगतच्या रहिवाशांनी पकडले होते. यानंतरही त्या ठिकाणी हा प्रकार सुरू असल्याचा संताप रहिवासी संपत घोलप यांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारामुळे रहिवासी, महिला व मुलांवर होणारे मानसिक परिणाम टाळण्यासाठी त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे. पालिकेने उद्यानाच्या सुरक्षेकडेही लक्ष द्यावे. याच उद्यानात अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा असल्याने उद्यानाचे पावित्र्य जपण्याची गरज घोलप यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)