पूजाचा मृतदेह आज घरी आणणार

By Admin | Updated: February 17, 2016 02:24 IST2016-02-17T02:24:14+5:302016-02-17T02:24:14+5:30

रशिया येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या पूजाचा मृतदेह बुधवारी घरी आणला जाणार आहे. रशिया येथून विमानाने आणले जाणारे पार्थिव दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोचण्याची शक्यता आहे.

Pooja's body will be brought home today | पूजाचा मृतदेह आज घरी आणणार

पूजाचा मृतदेह आज घरी आणणार

नवी मुंबई : रशिया येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या पूजाचा मृतदेह बुधवारी घरी आणला जाणार आहे. रशिया येथून विमानाने आणले जाणारे पार्थिव दुपारी दीड वाजेपर्यंत मुंबई विमानतळावर पोचण्याची शक्यता आहे. यानंतर सीवूड येथील राहत्या घरी तिचा मृतदेह आणला जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला गेलेल्या दोन भारतीय विद्यार्थिनींच्या अपघाती मृत्यूची घटना घडली आहे. इन्स्टिट्यूटच्या निवासी भागात लागलेल्या आगीमुळे राहत्या
खोलीत गुदमरून पुण्याची करिष्मा भोसले हिच्यासह पूजाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर
पूजाच्या निधनाची माहिती तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोचवण्यात रशियाच्या स्मोलेन्स्क अ‍ॅकॅडमीने हलगर्जीपणा केल्याचा तिच्या कुटुंबीयांनी
आरोप केला आहे. अखेर
भारतीय राजदूताच्या मदतीने त्यांना घटनेची माहिती मिळवावी
लागली.
यावेळी आगीमध्ये पूजाचा मृत्यू झाल्याचे त्यांना घटनेनंतर तब्बल ७ ते ८ तासांनी समजले. दरम्यान, मयत पूजाचे वडील सिद्दपा यांनी दुर्घटनेचा अहवाल मागवणार असल्याचे सांगितले आहे. मयत पूजाचे पार्थिव बुधवारी भारतात आणले जणार आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिचे पार्थिव मुंबई विमानतळावर
पोचणार आहे. त्यानंतर संध्याकाळपर्यंत सीवूड येथील राहत्या घरी तिचा मृतदेह आणला जाणार आहे. त्या ठिकाणी तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Pooja's body will be brought home today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.