शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
3
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
4
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
5
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
6
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
7
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
8
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
9
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
10
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
11
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
12
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
13
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
14
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
15
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
16
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
17
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
18
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
19
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
20
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार

मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:43 IST

याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी २६ जून २०२५ रोजी पालिका आयुक्त,  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. 

नारायण जाधव

नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदांच्या  निवडणुकीच्या कामाला लागला आहे. यानुसार मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवरील गर्दीला आळा घालण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एका इमारतीमध्ये १० पेक्षा जास्त मतदान केंद्र ठेवू नये, असे आदेश त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.

याच अंतर्गत मतदान केंद्राचे ठिकाण निवडताना एका प्रभागातील किंवा गावातील मतदाराला २ किमी. पेक्षा जास्त प्रवास करावा लागू नये अशा रीतीने शक्यतो त्याच प्रभागात किंवा गावात केंद्र असावे. ते मध्यवर्ती ठिकाणी असावे, असेही निर्देश दिले आहेत. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी २६ जून २०२५ रोजी पालिका आयुक्त,  जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. 

लोकसभा, विधानसभेला जिथे केले, तिथेच मतदानलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांकरिता मतदान करताना ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मतदान करतात त्याच इमारतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी देखील मतदान केंद्र असावे. कोणतेही मतदान केंद्र कोणत्याही परिस्थितीत पोलिस स्टेशन, रुग्णालय अथवा धार्मिक स्थळाच्या इमारतीत ठेवता येणार नाही. शिवाय मतदान केंद्र हे शासकीय, धर्मादाय संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारतीतच असावे, शक्यतो खासगी इमारतींत ते नसावे, असेही सूचित केले आहे.

गर्दीमुळे होणारा गोंधळ रोखण्यासाठी निर्णयमतदान करताना मतदारांची गर्दी होऊन गोंधळ निर्माण नये, यासाठी मतदान केंद्रनिहाय मतदारांची कमाल संख्या निश्चित केली आहे. यानुसार एक सदस्यीय प्रभाग असलेल्या मुंबई महापालिकेत मतदारांची कमाल संख्या १२०० निश्चित केली आहे. इतर पालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभागात ८०० ते ९००, चार सदस्यीय प्रभागात ७०० ते ८०० इतकी मतदार संख्या असावी असे बजावले आहे. नगरपालिकांसाठीही द्विसदस्यीय ९०० ते १००० आणि त्रिसदस्यीय प्रभागासाठी ७०० ते ८०० संख्या निश्चित केली आहे. शिवाय मतदान केंद्र, मतदारांसाठीच्या  सूचनांसह कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या नेहमीच्या सूचना कायम ठेवल्या आहेत.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग