पोलिसाच्याच घरात झाली चोरी

By Admin | Updated: October 31, 2014 00:27 IST2014-10-31T00:27:34+5:302014-10-31T00:27:34+5:30

शहरात चोरी व घरफोडी करणा:या टोळ्यांनी धुमाकुळ घातला आहे. दिवसाही मोठय़ाप्रमाणात चोरीच्या घटना होत असून यापासून पोलिसही सुटलेले नाहीत.

The police went to the house | पोलिसाच्याच घरात झाली चोरी

पोलिसाच्याच घरात झाली चोरी

नवी मुंबई : शहरात चोरी व घरफोडी करणा:या टोळ्यांनी धुमाकुळ घातला आहे. दिवसाही मोठय़ाप्रमाणात चोरीच्या घटना होत असून यापासून पोलिसही सुटलेले नाहीत. नेरूळमध्ये चक्क पोलिसाच्याच घरामध्ये चोरी झाली असून चोरटय़ांनी लॅपटॉपसह मोबाईल पळवून नेला आहे. 
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रत  महिलांचे दागिने, वाहन चोरी, व घरफोडीच्या घटना मोठय़ाप्रमाणात होत आहेत. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या नितीन पराडेवाड याच्या घरामध्येच 29 ऑक्टोबरला चोरी झाली आहे. नेरूळ सेक्टर 1 मधील शामस्मृती इमारतीमधील पराडेवाड याच्या घराच्या उघडय़ा दरवाजातून आत येवून चोरटय़ांनी लॅपटॉप, दोन मोबाईल पोलीस ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाना असा एकूण 35 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 
याप्रकरणी नेरूळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. आतार्पयत चोरीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले होते. परंतू आता चक्क या चोरटय़ांनी पोलिसांनाही लक्ष्य केले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: The police went to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.