भावावर वार करून गाठले पोलीस ठाणे

By Admin | Updated: June 13, 2017 03:33 IST2017-06-13T03:33:34+5:302017-06-13T03:33:34+5:30

चुलत भावाच्या डोक्यात वार करून मारेकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. गावावरून आलेल्या चुलत भावाला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून

Police Thane reached the spot on Bhave | भावावर वार करून गाठले पोलीस ठाणे

भावावर वार करून गाठले पोलीस ठाणे

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : चुलत भावाच्या डोक्यात वार करून मारेकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. गावावरून आलेल्या चुलत भावाला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून हत्येच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. परंतु वेळीच दुसऱ्या चुलत भावाने त्याठिकाणी धाव घेतल्याने जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.
अमित जेधे असे या प्रकारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा पुण्यातील खडकवासला भागातील राहणारा आहे. त्याच्या कुटुंबातील काही जण कोपरखैरणेत राहायला आहेत. यानुसार रविवारी तो मावस बहिणीच्या भेटीसाठी कोपरखैरणेत आला होता. यावेळी सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या सागर जेधे या चुलत भावाने त्याला फोन करून घरी बोलावले. यानुसार अमित त्याठिकाणी गेला असता, दोघांनी एकत्र जेवण करून काही वेळ गप्पा देखील मारल्या. यावेळी गावी असताना तुझ्या वडिलांनी मला का मारले, असा प्रश्न सागर याने अमितला विचारला. परंतु त्याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे अमितने सांगितले. यानंतर काही वेळाने दोघे जण घराबाहेर निघत असताना सागरने पाठीमागून अमितच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अमितने आरडाओरडा केला असता, शेजारीच राहणाऱ्या त्याच्या नितीन जेधे या दुसऱ्या चुलत भावाने त्याठिकाणी धाव घेवून अमितची सुटका केली.
यानंतर तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या हल्ल्यानंतर सागर हा पळाल्याचा सर्वांनी संशय व्यक्त करत असतानाच त्याने थेट पोलीस ठाणे गाठले होते. मी माझ्या भावाला
मारले आहे, असे सांगत त्याने
स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

- अमितवरील हल्ल्याची माहिती मिळताच, पुणे येथून त्याच्या कुटुंबीयांनी नवी मुंबईकडे धाव घेतली. परंतु सागरने त्याच्यावर का हल्ला केला याचे ठोस कारण कळलेले नाही. हल्ल्यात अमित गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर याने अमितवर हल्ल्याचा कट अगोदरच रचला होता अशी शक्यता वर्तवली जात आहे. याकरिता त्याने कोयत्याप्रमाणे धारदार शस्त्र देखील घरात आणून ठेवले होते.

Web Title: Police Thane reached the spot on Bhave