उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड
By Admin | Updated: November 1, 2014 22:36 IST2014-11-01T22:36:49+5:302014-11-01T22:36:49+5:30
उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली.

उल्हासनगरातील बारवर पोलिसांची धाड
ठाणो : उल्हासनगर परिसरातील विठ्ठलवाडी येथील एका बारवर ठाणो गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. या कारवाईत बार व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
विठ्ठलवाडीतील ‘हॉटेल मयूर बार अॅन्ड रेस्टॉरन्ट’मध्ये अनैतिक प्रकार सुरु असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक शकील शेख यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त पराग मणोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली शेख यांच्यासह उपनिरीक्षक शरद पंजे, हवालदार चासकर यांच्या पथकाने गुरुवारी रात्री 9 वा. च्या सुमारास या बारवर धाड टाकून 13 मुलींची सुटका केली. या बारच्या वरच्या बाजूला याच मुलींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय केला जात असल्याचेही उघड झाले. या प्रकरणी बार व्यवस्थापक नजरुल उर्फ साहिल मावेरुल (3क्), राजेश कनोजिया (36) आणि दिनेश उबारे (34) या तिघांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्यावर पिटांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून चार हजार 79क् रुपयांची रोकडही जप्त केल्याचे शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)