तक्रारीसाठी पोलिसाच्या पत्नीची रात्र पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:57 IST2019-05-24T22:57:01+5:302019-05-24T22:57:03+5:30
नवी मुंबई : घराच्या इंटेरियरच्या कामातून झालेल्या फसवणुकीची तक्रार करायला गेलेल्या महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी रात्रभर पोलीसठाण्यात बसून राहावे लागल्याचा ...

तक्रारीसाठी पोलिसाच्या पत्नीची रात्र पोलीस ठाण्यात
नवी मुंबई : घराच्या इंटेरियरच्या कामातून झालेल्या फसवणुकीची तक्रार करायला गेलेल्या महिलेला तक्रार नोंदवण्यासाठी रात्रभर पोलीसठाण्यात बसून राहावे लागल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, ही महिला पोलीसपत्नी आहे.
खारघर सेक्टर १९ येथे राहणाऱ्या एका पोलिसाच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी घराच्या डागडुजीनंतर परिसरातीलच एका इंटेरियर डिझाइनरला फर्निचरचे काम दिले होते. मात्र, चुकीमुळे संपूर्ण काम पुन्हा करण्याची वेळ आली. त्यास टाळाटाळ करीत सदर व्यक्तीने बसवलेले फर्निचरही घराबाहेर ठेवले व त्यानंतर झालेल्या संपूर्ण खर्चाच्या रकमेची मागणी केली जाऊ लागली; परंतु कामच पूर्ण झालेले नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने सातत्याने फोन करून तसेच घरी येऊन कर्मचाऱ्यांकडून मनस्ताप दिला जात असल्याचा आरोप सदर पोलीसपत्नीचा आहे.