शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीत पोलिसांचे मिशन ऑल आउट, गुन्हेगारांची धरपकड

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 17, 2024 18:17 IST

तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतल्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री मिशन ऑल आउट ऑपरेशन केले.

नवी मुंबई : अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी रात्री मिशन ऑल आउट राबवले. त्यामध्ये परिसरात केलेल्या झाडाझडती मध्ये तलबार बाळगणाऱ्या दोघांना अटक केली असून एकाकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय कोटपा कायद्यांतर्गत व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतल्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याच्या उद्देशाने व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शनिवारी रात्री मिशन ऑल आउट ऑपरेशन केले. उपायुक्त पंकज डहाणे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी हि मोहीम राबवली. त्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीला मुख्यालयाचे राखीव पोलिसबळ देण्यात आले होते. त्यांनी शनिवारी रात्री परिसरात नाकाबंदी करून अंतर्गतच्या भागात झाडाझडती घेतली. यामध्ये राहुल दांडगे (४१) य याच्याकडे १ लाख २० हजार रुपये किमतीचा १० किलो २०० ग्रॅम गांजा मिळून आला आहे. तर दोघांकडे प्रत्येकी एक अशा दोन तलवारी मिळून आल्या आहेत. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याशिवाय साडेसात हजाराची देशी दारू मिळून आली आहे. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान संशयित ७८ घरे व २७ आस्थापनांची झाडाझडती केली. त्यामध्ये दोन घुसखोर बांग्लादेशी देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. शिवाय हद्दपार केले असतानाही परिसरात वावरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीवरील गुंडा, हिस्ट्रीशिटर यांची देखील झाडाझडती घेऊन ते जागेवर आहेत का हे पडताळण्यात आले. त्यामध्ये पाहिजे असलेले दोन आरोपी देखील मिळून आले. त्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, नशा करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली.

वाहन चालकांवर कारवाई

कोम्बिंग ऑपरेशनच्या अनुशंघाने तुर्भे एमआयडीसी पोलिस व वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरित्या दोन ठिकाणी नाकाबंदी केली होती. त्याठिकाणी संशयित वाहनांची झाडाझडती करून कागदपत्रे देखील तपासण्यात आली. यामध्ये १६४ वाहनांच्या झाडाझडतीत १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी