बेशिस्त वाहनचालकांसह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर
By Admin | Updated: February 13, 2017 05:09 IST2017-02-13T05:09:39+5:302017-02-13T05:09:39+5:30
वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षा$ंत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे

बेशिस्त वाहनचालकांसह अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर
पनवेल : वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने गेल्या काही वर्षा$ंत अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून बेशिस्त वाहनचालक आणि अवैध वाहतुकीवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अधिकारी प्रदीप माने यांनी दिला आहे.
अनेकदा चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत, दुचाकीवर तीनजण बसणे, वेगमर्यादा न पाळणे, अल्पवयीन मुला-मुलींना गाड्या चालवण्यास देणे, वाहनपरवाना न वापरणे, सीट बेल्ट न लावणे या कारणांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
वाळूची बेकायदा व अतिरिक्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नुकतीच कारवाई करण्यात आली. ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असून अवैध प्रवासीवाहतूक, ओव्हरलोड वाळू, कोळसा, कंटेनरचालक व बेशिस्त लक्झरी बसेस यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पनवेल-गोवा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतुकीवरही पोलिसांची नजर असल्याचे माने यांनी सांगितले.