पोलीस हवालदारास एक वर्षाची शिक्षा

By Admin | Updated: December 12, 2015 02:30 IST2015-12-12T02:30:11+5:302015-12-12T02:30:11+5:30

लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबईतील पोलीस हवालदार केशव पाटील यांना ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एम. वलीमहमद यांनी दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा ठोठावली.

Police Havildar gets one year's education | पोलीस हवालदारास एक वर्षाची शिक्षा

पोलीस हवालदारास एक वर्षाची शिक्षा

ठाणे : लाच घेतल्याप्रकरणी नवी मुंबईतील पोलीस हवालदार केशव पाटील यांना ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एम. वलीमहमद यांनी दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा ठोठावली. ते त्यावेळी नेरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत
होते.
सोनसाखळी आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तक्रारदारांकडून त्यांनी १२ हजारांची मागणी केली होती. त्यानुसार, २००९ मध्ये पैसे घेताना त्यांना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण होऊन ठाणे विशेष न्यायालयात खटला दाखल झाल्यावर सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी सबळ पुरावे सादर केले.
त्यानुसार, न्यायाधीश वलीमहमद यांनी गुरुवारी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८चे कलम ७ प्रमाणे
६ महिने कैद व ५०० रुपये दंड
शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास
१ महिना साधी कैद आणि कलम
१३ (१) (ड) अन्वये १ वर्षे कैद व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. एन. कराळे यांनी केला.

Web Title: Police Havildar gets one year's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.