पोलिसांनी थकविले एनएमएमटीचे ४.५ कोटी

By Admin | Updated: October 29, 2015 23:50 IST2015-10-29T23:50:07+5:302015-10-29T23:50:07+5:30

ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी एनएमएमटीच्या प्रवास भाड्याचे साडेचार कोटी रुपये थकविले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी एनएमएमटी व्यवस्थापनाचा संबंधित आयुक्तालयांकडे पाठपुरावा सुरू आहे

Police exhausted NMMT's 4.5 crores | पोलिसांनी थकविले एनएमएमटीचे ४.५ कोटी

पोलिसांनी थकविले एनएमएमटीचे ४.५ कोटी

कमलाकर कांबळे, नवी मुंबई
ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी एनएमएमटीच्या प्रवास भाड्याचे साडेचार कोटी रुपये थकविले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी एनएमएमटी व्यवस्थापनाचा संबंधित आयुक्तालयांकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून पोलीस विभागाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. त्यामुळे परिवहन व्यवस्थापन चक्रावून गेले आहे.
एनएमएमटीकडून पोलीस कर्मचाऱ्यांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. प्रवास भाड्याची ही रक्कम वर्षाला एनएमएमटीकडे जमा होणे अपेक्षित असते. परंतु मागील सहा वर्षांपासून पोलिसांकडून एकही पैसा एनएमएमटीला मिळालेला नाही. याचा परिणाम म्हणून परिवहन उपक्रमाचे तब्बल साडेचार कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीची ही रक्कम ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची आहे. ती वसूल करण्यासाठी व्यवस्थापनाचा गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे अगोदरच तोट्यात चाललेल्या परिवहन उपक्रमाला आपले आर्थिक गणित जुळविताना कसरत करावी लागत आहे. महापालिकेची परिवहन सेवा तोट्यात आहे. उत्पन्न आणि खर्च यात मेळ बसविण्यासाठी उपक्रमाला महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. महिन्याला जवळपास पावणेदोन कोटी रुपये एनएमएमटीला महापालिकेकडून घ्यावे लागतात. विशेष म्हणजे मागील दोन अडीच वर्षात एनएमएमटीच्या कारभारात सुधारणा झाली आहे. मासिक तोट्यातही काही प्रमाणात घट झाली आहे. परिवहनच्या दृष्टीने ही समानधानकारक बाब असली तरी पोलिसांकडील साडेचार कोटींची थकबाकी ही व्यवस्थापनाची डोकेदुखी ठरली आहे.

Web Title: Police exhausted NMMT's 4.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.