पनवेलात सिडकोकडून नाल्यांची झाडाझडती
By Admin | Updated: November 28, 2014 22:43 IST2014-11-28T22:43:29+5:302014-11-28T22:43:29+5:30
नवीन पनवेल नोडमध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरिता जे ट्रॉम वॉटर ड्रेनेज तयार केले आहेत,

पनवेलात सिडकोकडून नाल्यांची झाडाझडती
पनवेल : नवीन पनवेल नोडमध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्याकरिता जे ट्रॉम वॉटर ड्रेनेज तयार केले आहेत, त्यामध्ये पावसाळय़ातच नाही तर हिवाळा आणि उन्हाळय़ात म्हणजे बारामाही पाणी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू व मलेरियासारख्या साथींचा फैलाव होत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक संदीप पाटील यांनी वस्तुस्थिती मांडल्यानंतर नाल्यांची साफसफाई सुरु केली आहे. हिवाळय़ात प्रथमच अशाप्रकारे मोहीम सिडकोने हाती घेतली आहे.
सिडकोने सर्वात अगोदर नवीन पनवेल नोड विकसित केला. सुरुवातीला फक्त सिडकोच्या इमारती उभारताना या ठिकाणी अंतर्गत रस्ते, पावसाळी पाणी वाहून जाण्याकरिता गटारांची निर्मिती करण्यात आली, मात्र हे गटार जमिनीची खोली, पाण्याची पातळी उंच, सखल भाग या सर्व गोष्टींचा विचार करुन तयार केले नाही. सेक्टर 13, 14, 15, 17, 18 या ठिकाणी जवळपास 1क् कि.मी. लांबीची ट्रॉम वॉटर ड्रेनेज बांधण्यात आले आहेत. त्याची सिडकोकडे सातत्याने डागडुजी होत असली तरी ज्या हेतूने ही यंत्रणा विकसित केली, त्याचा 1क्क् टक्के फायदा होताना दिसत नाही.
नैसर्गिक स्थितीचा विचार करुन या गटारांची निर्मिती केलेली नसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची वस्तुस्थिती संदीप पाटील यांनी सिडको प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अभ्युदय बँक, बांठिया हायस्कूल समोरील नाले सर्वात जास्त लांबीचे असून त्यांच्यावरच मोठा भार आहे, मात्र या दोनही ड्रेनेजमधून सर्व पाणी वाहून जात नसल्याने पावसाळाच काय तर हिवाळा आणि उन्हाळय़ातही पाणी साठून राहाते. यामुळे डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवीन पनवेल नोडमध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळल्याने हे कशामुळे होते याबाबत चर्चा झाली. सिडको प्रशासनाने यासंदर्भात शोध घेतला. सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर विचारविनिमय करण्यात आला. स्थानिक नगरसेवक संदीप पाटील यांनी याबाबत सिडकोबरोबर समन्वय साधून सोसायटय़ांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याची संकल्पना मांडली. त्याचबरोबर केवळ मान्सूनपूर्व नालेसफाई न करता ते सातत्याने क्लिन करण्याचा आग्रह धरला.
त्यानुसार प्रशासनाने पावसाळी नाले स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. नाल्यांमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना प्राधिकरणाने हाती घेतल्या आहेत. अभ्युदय बँकेसमोरील झोपडपट्टीलगत मलनिस्सारण वाहिनीची साफसफाई हाती घेण्यात आली असून जिकडे तिकडे पाणी साचल्याचे कामगारांना आढळून येत आहे. (वार्ताहर)
डेब्रिज, प्लास्टिक
आणि सांडपाणी
4पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता बांधण्यात आलेल्या ड्रेनेजमध्ये डेब्रिज, माती त्याचबरोबर प्लास्टिकच्या पिशव्या मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. याचे कारण म्हणजे मान्सून साफसफाईच्या काळात फक्त चेंबरच्या जवळची सफाई केली जात असल्याचे यावरुन उघड झाले आहे. संबंधित ठेकेदार आणि अधिका:यांचे लागेबांधे असल्याने योग्यरीत्या ड्रेनेज क्लिन केले जात नसल्याचे म्हणणो आहे.
मलनि:सारण वाहिन्यांना गळती
4अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्या जुनाट झाल्या आहेत. त्यांना गळती लागल्याने ते पाणी ट्रॉम वॉटर ड्रेनेजमध्ये जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी सांडपाणीही या गटारांमध्ये सोडले जात आहे, म्हणून या गटारांमध्ये पाणी साचणार नाही याकरिता सिडकोने खबरदारी घ्यावी, अशी मागणी संदीप पाटील यांनी केली.