‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ प्लॅन बी कार्यान्वित
By Admin | Updated: August 11, 2016 04:10 IST2016-08-11T04:10:36+5:302016-08-11T04:10:36+5:30
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही

‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ प्लॅन बी कार्यान्वित
आविष्कार देसाई, अलिबाग
स्वच्छ भारत अभियानाची अंमलबजावणी म्हणजे लोखंडाचे चणे चावण्याचाच प्रकार असल्याचा प्रत्यय सर्वत्र दिसून येत आहे. या मिशनला जनतेकडून पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मिशन पुढे रेटण्यासाठी सरकारने आता ‘भेटीगाठी स्वच्छतेसाठी’ या नावाने प्लॅन बी कार्यान्वित केला आहे. मिशन यशस्वी करण्यासाठी आधीच सरकारने वेगवेगळ्या प्रकारे नियोजन करु न ठेवले आहे. त्यामुळे एखादा प्लॅन फेल गेला तरी, दुसऱ्या प्लॅनवर त्यांना तातडीने काम करता येणार आहे. सरकारची ही स्ट्रॅटजी प्रशंसनीय असली, तरी त्याचा फायदा कितपत होतो यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.
या प्लॅननुसार राज्यातील १८ लाख, तर रायगड जिल्ह्यातील ३५ हजार कुटुंबांच्या गृहभेटीवर लक्ष केंद्रित करु न उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. २०१६-१७ मधील वार्षिक कृती आराखड्यामधील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर २०१६ हा कालावधीत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सरकारने प्लॅन बीसाठी अॅक्शन प्लॅनही तयार केला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनांचे फर्मान ६ आॅगस्ट २०१६ रोजी काढले आहे. रायगड जिल्ह्यातील वार्षिक कृती आराखड्यातील शौचालय नसलेल्या ३८१ ग्रामपंचायती आहेत. या अभियानात ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. ग्रामस्तरावरील पाच हजार ७१५, क्षेत्रीयस्तरावरील १५०, जिल्हास्तरावरील २२५ अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कामाची अपेक्षा केली जात आहे. इतरवेळी ग्रामसभांमधून त्यांना फक्त आवाहनच करता येत होते, गृहभेटीमुळे शौचालय नसलेल्यांच्या घरी गेल्याने त्यांच्याशी शेट संवाद साधणे शक्य होणार आहे. राष्ट्रीय अभियानासाठी लोकसहभाग आणि लोकसमर्थन मिळविण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे असे कार्यक्र म व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी सांगितले.