गुलाबी थंडीतही उबदार फॅशन !

By Admin | Updated: December 28, 2015 03:00 IST2015-12-28T03:00:37+5:302015-12-28T03:00:37+5:30

बदलत्या ऋतूबरोबर फॅशनमध्येही बदल होतो. हिवाळ््याला सुरुवात होताच बाजारात उबदार कपड्यांच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळत आहेत.

Pink fashion cooler! | गुलाबी थंडीतही उबदार फॅशन !

गुलाबी थंडीतही उबदार फॅशन !

प्राची सोनवणे,  नवी मुंबई
बदलत्या ऋतूबरोबर फॅशनमध्येही बदल होतो. हिवाळ््याला सुरुवात होताच बाजारात उबदार कपड्यांच्या अनेक व्हरायटी पाहायला मिळत आहेत. विंटर फॅशनचा नवा ट्रेण्ड यंदा पाहायला मिळतोय. स्वेटर्सकडेही एक फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जात असल्याने लाइट वेट स्वेटर्स या पर्यायाला नागरिकांनी चांगलीच पसंती दाखविली आहे. नेहमीच्या लाल, काळ््या चॉकलेटी रंगांची जागा आता रॉयल ब्लू, नेव्ही ब्लू, फ्लोरोसन्स, पॅरोट ग्रीन, ब्लड रेड, मोरपंखी, बेबी पिंक, पर्पल अशा आकर्षक रंगांमध्ये हे स्वेटर्स मिळत असल्याने थंडी नसली तरी खरेदी करण्याचा मोह आवरत नाही. वुलन, कॉटन आणि लिनन यांपासून हे स्वेटर्स बनविले जात असल्याने याचे वजन तर कमीच असते, परंतु हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण तर उन्हाळ्यात कूल वाटतात, असे फॅशन डिझायनर माधुरी शेळकेढ हिने सांगितले.
काही वर्षांपूर्वी थंडीचे कपडे म्हटले की टिपिकल स्वेटर्स, शाली आणि मफलर मिळायचे. त्यांचे रंगातील वैविध्य सोडले तर फारशी व्हरायटी नसायची. म्हणजे रंग कुठलाही असू दे स्वेटर हे स्वेटरसारखं दिसायचं. उबदार कपड्यांच्या, लोकरीच्या वैविध्यपूर्ण डिझाइन्सची चलती आहे. टी-शर्टस अशा अनेक प्रकारांत विंटरसाठी डिझाइन केलेले कपडे मिळू लागल्याने तरुणांना पूर्वी स्वेटर्स ज्या पॅटर्नमध्ये मिळायचे त्यात उपयुक्तता होती; पण स्टाईल मात्र नव्हती. परंतु आता स्टड्ढेप्स, बॉर्डर किंवा तत्सम डिझाइन्स असलेले चार-पाच रंगांत विणलेले स्वेटर्स कम पूल ओव्हर, झिपर जीन्सवर घालणं हा तर सध्या फण्डा बनला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणारे मफलर्स, जाडजूड स्वेटर्स आता आऊटडेटेड झालेअसून, मफलरसारखे दिसणारे स्कार्फ, स्टोल्सना मात्र मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. अशा या लोकरीच्या कपड्यांना फॅशन टच येऊ लागल्याने या कपड्यांची चलती आहेच. त्यात सध्या थंडीची सुरु वात झाल्याने वुलन कपड्यांना प्रचंड मागणी आहे.
लोकरीच्या स्वेटर्सचे ओझे खूप असते. त्यामुळे आॅफीस किंवा कॉलेजला जाताना ते सांभाळणे खूपच त्रासदायक ठरते. आता लाइट वेट स्वेटर्समुळे लूकच बदलल्यामुळे व त्याचे ओझेही वाटत नसल्यामुळे तरु णाईचा कल लाइट वेट स्वेटर्सकडेच असल्याचे वाशीतील विक्रेता भरत शहा याने सांगितले. हे स्वेटर ७०० रु पयांपासून ते अगदी ३ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

Web Title: Pink fashion cooler!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.