राजकीय पक्षांना स्थायीचे वेध
By Admin | Updated: October 28, 2014 23:10 IST2014-10-28T23:10:41+5:302014-10-28T23:10:41+5:30
पालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समिती सदस्यांची व सभापती पदाची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ घातली असून त्याचे वेध स्थानिक राजकीय पक्षांना आत्तापासूनच लागले आहेत.

राजकीय पक्षांना स्थायीचे वेध
राजू काळे ल्ल भाईंदर
पालिकेतील अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समिती सदस्यांची व सभापती पदाची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होऊ घातली असून त्याचे वेध स्थानिक राजकीय पक्षांना आत्तापासूनच लागले आहेत. स्थायीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजपा युतीच्या सदस्यांची समान असून यंदाचे सभापतीपद मात्र कोणाच्या पदरी पडणार, हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.
पालिकेत सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांत 1 अपक्षासह राष्ट्रवादीचे 27, काँग्रेसचे 19, विरोधी पक्षातील युतीच्या सदस्यांत भाजपाचे 28, 1 मनसेसह शिवसेनेचे 15, बहुजन विकास आघाडी (बविआ)चे 3 सदस्य आहेत. एकुण 95 नगरसेवकांपैकी 92 नगरसेवक पदावर असून उर्वरीत 3 पैकी 2 जागा रिक्त तर 1 पदावरील वाद सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीचे माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी बविआला सभापतीपदाचे आश्वासन देऊन त्यांना आपल्या बाजूने खेचले होते. सभापतीदाच्या निवडणुकीवेळी मात्र मेंडोन्सा यांनी भाजपाच्या सीमा शाह यांना फोडण्यात यश मिळविल्याने राष्ट्रवादीने स्थायी काबीज केली होती.
दुस:या टर्मवेळी भाजपाने बविआलाच छेद देत त्यांना आपल्या बाजूने खेचून स्थायी सदस्य बविआचे राजू भोईर यांना फोडण्यात यश मिळवुन सभापतीपद आपल्याकडे राखण्यात यश मिळविले. यंदाची सदस्य निवड नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यानंतर सभापतीपदाची निवडणूक डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यात यंदाच्या स्थायीचे सभापतीपद कोणता पक्ष गनिमी काव्याने हस्तगत करेल, यासाठी आत्तापासुनच फिल्डींग लावण्यास सुरूवात झाली आहे. सध्या स्थायीत आघाडी व युतीच्या सदस्यांची संख्या समान असुन त्यात राष्ट्रवादी व भाजपाचा सदस्य फोडाफोडीचा गेम महत्वाचा ठरणार आहे. त्यासाठी बविआने निवडणूक काळातच राजकीय सेटिंग केल्याची चर्चा सुरु झाली असली तरी स्थायीतील समान सदस्य संख्येमुळे सभापतीपद चिठ्ठीद्वारे अथवा सदस्य फोडाफोडीच्या राजकारणातुनच आघाडी अथवा युतीच्या पदरात पडणार असल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे.