शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

नेरुळ येथील पादचारी पूल धोकादायक; दुरुस्तीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:41 PM

सिडको, महापालिकेच्या पाठपुराव्याला केराची टोपली, खर्चासाठी तयार असतानाही रेल्वेचे मौन

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : नेरुळ येथील रेल्वेरुळावरील पादचारी पूल जीर्ण झाल्याने तो वापरासाठी बंद करण्यात आला आहे. त्याठिकाणी नव्या पुलाची आवश्यकता असल्याने त्यासाठी पालिका खर्च करण्यास तयार असतानाही रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे जीर्ण झालेला पूल रेल्वेवर कोसळून त्याठिकाणी मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.नेरुळ येथील सेक्टर ८ व २९ या पूर्व व पश्चिमेकडील भागाला जोडण्यासाठी सुमारे २० वर्षांपूर्वी सिडकोने रेल्वेरुळावर पादचारी पूल उभारलेला आहे. हा पूल सद्यस्थितीला जीर्ण झाल्याने कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे. दोन दिवसांपासून पालिकेने या पुलाचा वापर करण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे एका विभागातून दुसऱ्या विभागात जाण्यासाठी पादचाऱ्यांना लांबचे अंतर कापावे लागत आहे. सदर पूल अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असल्याने त्याठिकाणी नवा पूल उभारण्याची नागरिकांची मागणी आहे. त्या अनुषंगाने नगरसेविका सुनीता रतन मांडवे यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून नव्या पुलासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र सद्यस्थितीतला पूल सिडकोने बांधलेला असल्याने त्याची डागडुजी अथवा नवा पूल देखील त्यांनी करावा, अशी मागणी पालिकेने सिडकोकडे केली आहे. त्याला अनुसरून सिडकोने ही जागा रेल्वेच्या क्षेत्रात असल्याने सदर निर्णय रेल्वे प्रशासनावर सोपवला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून सिडको अथवा पालिकेला कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. पर्यायी खासदार राजन विचारे यांच्यासह पालिका आयुक्तांनी स्वत: पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.रेल्वे प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे त्याठिकाणी गंभीर दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. नेरुळ येथील रेल्वेरुळावरील या पादचारी पुलाला जागोजागी तडे गेले आहेत. तर पुलाच्या खालच्या भागाचे प्लास्टर ढासळून सळ्या उघड्यावर आल्या आहेत. यानंतरही अनेक वर्षे हा पूल वापरात ठेवल्यानंतर दोन दिवसांपूर्वी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेने त्याचा वापर बंद केला आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या दोन टोकांव्यतिरिक्त मध्यभागी कोणत्याही प्रकारचा आधार देण्यात आलेला नाही. यामुळे पादचाºयांसाठी पुलाचा वापर बंद केलेला असला तरीही जीर्ण झालेल्या पुलाच्या भागात पावसाचे पाणी मुरल्यास अथवा पुलाखालून जाणाºया रेल्वेच्या हादºयानेही तो कोसळण्याची भीती आहे. अशावेळी पुलाचा एखादा भाग रेल्वेवर कोसळल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.तीन महिन्यांपूर्वी वाशीतील मिनी सीशोर येथील जीर्ण अवस्थेतील पादचारी पुलाचा भाग कोसळून दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती.पादचाºयांसाठी तूर्तास पुलास वापर बंदरेल्वेरुळावरील अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर रेल्वेरुळावरील जुन्या सर्वच पुलांबाबत रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जाणे आवश्यक आहे. त्यानंतरही नेरुळ येथील पादचारी पूल कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीमध्ये असतानाही त्याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावरून रेल्वे प्रशासनाला त्याठिकाणी गंभीर दुर्घटनेचीच प्रतीक्षा असल्याची साशंकता व्यक्त होत आहे.नेरुळ पूर्व व पश्चिम भागाला जोडण्यासाठी सेक्टर ८ येथील पादचारी पूल सोयीस्कर आहे. त्यावरून दररोज शेकडो पादचारी एका विभागातून दुसºया विभागात प्रवास करायचे. त्यामध्ये लहान थोरांसह विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र धोकादायक झाल्याने पुलाचा वापर बंद केल्याने त्या सर्वांची गैरसोय झाली आहे.नेरुळ सेक्टर ८ व २९ या दोन भागांना जोडण्यासाठी रेल्वेरुळावरील सुमारे २० वर्षांपूर्वीचा पादचारी पूल एकमेव सोयीचा पर्याय आहे. सदर पूल धोकादायक झाल्याने पुलावरून प्रवास करणाºया पादचाºयांसह पुलाखालील रेल्वेतून प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांच्या जीवावर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मात्र पालिकेसह सिडकोने पाठपुरावा करून देखील रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. - सुनीता मांडवे, नगरसेविका