ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची आघाडी
By Admin | Updated: October 29, 2015 23:41 IST2015-10-29T23:41:21+5:302015-10-29T23:41:21+5:30
तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ आॅक्टोबरला मतदान झाल्यानंतर गुरु वारी मतमोजणी झाली

ग्रामपंचायत निवडणुकीत शेकापची आघाडी
कर्जत : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८ आॅक्टोबरला मतदान झाल्यानंतर गुरु वारी मतमोजणी झाली. कडावमध्ये मनसेने बाजी मारताना तीन पक्षांच्या आघाडीचा दारु ण पराभव केला. तर दामत ग्रामपंचायत शेकापच्या हातून गेली असून भिवपुरीमध्ये शिवसेना आणि वैजनाथमध्ये सेना-भाजपा युतीने विजय मिळवला आहे.
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या कडाव ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी- शिवसेना- काँग्रेसच्या आघाडीचा शंभर टक्के यश संपादन करून दारु ण पराभव केला. तेथे प्रभाग एकमधून किशोर भुंडेरे, काशिनाथ मराडे, गुलाब बैलमारे हे तीन उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग दोनमधून नीलेश भोईर, गीता गायकवाड आणि नंदिनी पवाळी-बिनविरोध हे उमेदवार विजयी झाले. प्रभाग तीनमध्ये अमर शिंदे, संध्या पवाळी हे उमेदवार विजयी झाले. तर प्रभाग चारमध्ये योगेश बांदल, करु णा पवार हे दोन उमेदवार विजयी झाले असून प्रभाग पाचमधून किसन पवार, सुषमा पवाळी हे उमेदवार विजयी झाले असून विजयी सर्व उमेदवार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत.
भिवपुरी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने पुन्हा सत्ता काबीज केली असून तेथे शिवसेनेने पाच आणि भाजपाने दोन जागा जिंकल्या आहेत.
वैजनाथ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना- भाजपा युतीने पुन्हा एकदा बाजी मारली. तर हुमगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २३ एप्रिल २०१५ ला झाली होती, त्यावेळी तेथील दोन जागा जात पडताळणी नसल्याने रिक्त राहिल्या होत्या. त्या दोन जागांसाठी देखील पोटनिवडणूक झाली असून केवळ एकाच जागेसाठी नामांकन अर्ज आला होता, तेथे अनंता भुंडेरे हे बिनविरोध निवडून आले.
दामत-भडवळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग एकमधून तिन्जला इरफान नजे आणि अजमल कादिर तांबोळी हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. (वार्ताहर)
च्ऐनघर येथील विद्यमान सरपंच असलेले शेकापचे सरपंच महादेव मोहिते यांना आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार मनोहर सुटे यांनी पराभवाचा झटका
दिला आहे.