शेकापचा बालेकिल्ला अबाधित

By Admin | Updated: October 20, 2014 03:26 IST2014-10-20T03:26:58+5:302014-10-20T03:26:58+5:30

अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापने शिवसेना, काँग्रेस, भाजपाचा धुव्वा उडवित आपली विजयी मोहर उमटवली

Peacock's citadel unrestricted | शेकापचा बालेकिल्ला अबाधित

शेकापचा बालेकिल्ला अबाधित

अलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापने शिवसेना, काँग्रेस, भाजपाचा धुव्वा उडवित आपली विजयी मोहर उमटवली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्यातही त्यांना यश आले. पंडित पाटील यांच्या यशाने शेकापचा बालेकिल्ला अबाधित राहीला आहे.
पंडित पाटील यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात जल्लोषाचे वातावरण होते. बारावी पास असणारे शेकापचे सुभाष तथा पंडीत पाटील यांनी ७६ हजार ९५९ मते मिळवित मतदारांच्या परिक्षेत उत्तीर्ण झाले. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांना ६० हजार ८६५ आणि काँग्रेसचे मधुकर ठाकूर यांना केवळ ४५ हजार ८५३ मतांवर समाधान मानावे लागले.
पाटील यांनी दळवी यांचा १६ हजार ९४ मतांनी पराभव केला तर, ३१ हजार १०६ अशा प्रचंड मतांनी काँग्रेसच्या ठाकूर यांचा सुपडासाफ करण्यात पाटील कमालीचे यशस्वी झाले.
अलिबाग-मुरुड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. भाजपाचे प्रकाश काठे यांना सहा हजार ५४ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश मोहिते यांना तीन हजार ५००, बसपाचे अनिल गायकवाड या राजकीय पक्षांचे डिपॉझीट जप्त झाले. अन्य नऊ अपक्ष उमेदवारांनाही आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. त्यामध्ये हुन्साबीबी हळदे या अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. एकूण मतांच्या एक शष्टांश मते उमेदवारांना मिळाली तर त्याचे डीपॉझीट वाचू शकते असे, निवडणूक निर्णय अधिकारी दिपक क्षीरसागर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Peacock's citadel unrestricted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.