शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वाशीमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:04 PM

नागरिकांची पायपीट थांबणार; पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये सोय

नवी मुंबई : वाशीतील पोस्ट कार्यालयाच्या इमारतीमध्ये पासपोर्ट विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी नवी मुंबईकरांची होणारी पायपीट यापुढे थांबणार आहे. गेली अनेक वर्षांपासून नवी मुंबईकरांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती.शहरातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक प्रक्रियेकरिता ठाणे येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागत होते. यामध्ये त्यांचा वेळही जात होता, शिवाय प्रवासभाड्यात खिशाला झळही बसायची. यामुळे नवी मुंबईत स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय सुरू व्हावे अशी नागरिकांची मागणी होती.अनेक वर्षांपासून जागेअभावी ही मागणी पूर्ण होऊ शकलेली नव्हती. मागील दीड वर्षापासून पासपोर्ट विभागाकडून कार्यालयासाठी स्वतंत्र जागेचा शोध सुरू होता. अखेर वाशीतील पोस्ट कार्यालयात पासपोर्ट कार्यालयासाठी जागा उपलब्ध झाली आहे. यानुसार रविवारी त्याठिकाणच्या नव्या पासपोर्ट कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, नगरसेवक नामदेव भगत आदींसह पासपोर्ट कार्यालयाचे अधीक्षक अजयकुमार सिंग, अधिकारी विजयकुमार नायर उपस्थित होते.वाशीतील या पासपोर्ट कार्यालयाचा लाभ नवी मुंबईसह पनवेल परिसरातील नागरिकांना होणार आहे. सद्यस्थितीला नवी मुंबईसह पनवेलकरांना पासपोर्ट संबंधीच्या कामासाठी ठाणे अथवा मुंबईला जावे लागत आहे. यामध्ये नागरिकांचा कार्यालयीन प्रक्रियेपेक्षा सर्वाधिक वेळ प्रवासातच जात आहे. लहान मुलांसह वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होताना दिसून येत आहे. यामुळे वाशीत नवे पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने ऐरोली ते पनवेलपर्यंतच्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

टॅग्स :passportपासपोर्ट