शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग प्रश्नावर महापालिका हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:08 IST

मुंबईच्या धर्तीवर हवी दंडात्मक कारवाई: पे अ‍ॅण्ड पार्किंग मोफत करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या हालचाली

नवी मुंबई : सुनियोजित नवी मुंबई शहरातील पार्किंगचे नियोजन पूर्णत: फसले आहे. शहराचे नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणाºया महापालिकेला सुद्धा गेल्या वीस वर्षात पार्किंगचे सुयोग्य नियोजन करण्यात हतबल ठरली आहे. परिणामी शहरवासीयांत मनमानी पद्धतीने वाहने पार्क करण्याची मानसिकता बळावली आहे. या मानसिकतेला आळा घालण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पार्किंग क्षेत्राबाहेर मनमानी पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याची मागणी आता पुढे येवू लागली आहे. यातच महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने शहरातील पे अ‍ॅण्ड पार्क मोफत करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात शहरातील पार्किंग समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई शहरातील बेकायदा पार्किंगला आळा घालण्यासाठी महापालिकेने अधिकृत पार्किंग स्थळापासून ५00 मीटर अंतरावर वाहने उभी केल्यास संबंधितांना एक हजार ते दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने मुंबईच्या धर्तीवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याची गरज असल्याचे शहरवासीयांचे मत आहे. नवी मुंबईत पार्किंगच्या नावाने सुरुवातीपासून बोंब आहे. शहराची निर्मिती करताना सिडकोने पार्किंगचे योग्य नियोजन केले नाही. मागील वीस वर्षात महापालिकेकडून सुध्दा यासंदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही.

विविध कामानिमित्त शहराबाहेरून येणाºया वाहनांच्या प्रमाणातही वाढ झाली. परंतु वाहनतळाच्या संख्येत मात्र कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळेच माहिती व तंत्रज्ञानाच्या आधुनिक शहरासमोर पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी मल्टिस्टोअरेज पार्किंगची योजना पुढे आली होती. उपलब्ध जागा आणि आवश्यकता लक्षात घेवून शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारचे पार्किंग स्लॉट तयार करण्याची योजना महापालिकेतील सत्ताधाºयांनी आणली होती. विशेष म्हणजे महापालिकेचे माजी आयुक्त पी.एस.मीना यांनी शहराचा दौरा करून बहुमजली पार्किंगसाठी संभाव्य जागांचा आढावा घेतला होता. परंतु त्यांच्या बदलीनंतर ही योजना कागदावरच सीमित राहिली. मीना यांच्या बदलीनंतर मागील दहा बारा वर्षात महापालिकेत आलेल्या एकाही आयुक्ताने शहरातील पार्किंगच्या विषयावर गांभीर्याने विचार केला नाही. उपलब्ध जागेनुसार शहरात वाहनतळ आहेत. परंतु तुलनात्मकदृष्ट्या ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे वाहनधारक जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. त्यावर उपाय म्हणून महापालिकेने शहरात ठिकठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्क सुरू केले आहेत. परंतु हे पे अ‍ॅण्ड पार्क सुध्दा कुचकामी ठरल्याचे चित्र आहे. कारण अनेक ठिकाणी गरज नसतानाही पे अ‍ॅण्ड पार्कचे फलक लावण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे अनेक भागात वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर सुध्दा असे फलक लावून वाहनधारकांकडून वसुली केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे वाहनधारक आणि स्थानिक रहिवाशांत या पे अ‍ॅण्ड पार्कच्या विरोधात नाराजी आहे.पे अ‍ॅण्ड पार्किंगचा गोरखधंदाशहरातील मॉल्सच्या तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे वाहने पार्क करण्यासाठी भरमसाठ शुल्क आकारले जाते. मुळात ही वसुली बेकायदा असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.बांधकाम परवानगी देताना अधिनियमातील तरतुदीनुसार कोणालाही पार्किंग शुल्क आकारता येत नाही, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानाही शहरातील बहुतांशी मॉल्स चालकांकडून पार्किंग शुल्क आकारले जाते. पे अ‍ॅण्ड पार्किंगच्या या गोरखधंद्याला महापालिकेच्यासंबंधित विभागातील अधिकाºयांचा अर्थपूर्ण पाठिंबा असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.वाहतूक पोलिसांची कसरतपे अ‍ॅण्ड पार्क असून सुध्दा वाहनधारक मनमानी पध्दतीने वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बेकायदा पार्किंग करणाºया वाहनांना जॅमर लावून संबंधितांकडून दंड वसूल करणे, इतकेच काम सध्या वाहतूक पोलिसांना करावे लागत आहे. परंतु त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. ही कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांची मोठी कसरत होताना दिसत आहे.सत्ताधाºयांचा तुघलकी निर्णयविधानसभा आणि त्यापाठोपाठ येणाºया महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादीने शहरवासीयांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची बरसात सुरू केली आहे. पाचशे फुटापर्यंतच्या सदनिकांना मालमत्ता करातून माफी देण्याच्या घोषणेनंतर शहरातील पे अ‍ॅण्ड पार्क विनामूल्य करण्याचा तुघलकी निर्णय आता सत्ताधाºयांनी घेतला आहे. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत या संबंधिताचा ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.