पनवेलच्या दोन एसटी कर्जतमधून सुटणार
By Admin | Updated: March 11, 2016 02:41 IST2016-03-11T02:41:55+5:302016-03-11T02:41:55+5:30
पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले

पनवेलच्या दोन एसटी कर्जतमधून सुटणार
कर्जत: पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले. मात्र आता पनवेलकडे जाणाऱ्या दोन बस शहरातून सुटणार आहेत. या उपक्र माचे उद्घाटन करण्यात आले. या एसटी सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
सकाळी कर्जत तालुक्यातून पनवेलकडे जाणाऱ्या चाकरमानी, व्यावसायिक व विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकाच्या पलीकडे असलेल्या एसटी स्थानकातून एसटी पकडावी लागत असे, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. हा त्रास होऊ नये म्हणून कर्जत शहर शिवसेना प्रमुख भालचंद्र जोशी यांनी पत्रव्यवहार करून एसटी आगाराकडून तशी मान्यता मिळविली. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शिवसेना जिल्हा प्रमुख दिनेश पाटील यांच्या हस्ते या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.