शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यावरून पनवेलचे राजकारण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:27 IST

महासभेत उमटणार पडसाद; विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

- वैभव गायकर पनवेल : महापालिकेने गुरुवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावरून पनवेलमधील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधकांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, दिवसाआड पाणी देण्याच्या निर्णयावरून सत्ताधारी भाजपाची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे.मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. त्या वेळी भाजपाने या निर्णयाला विरोध करत हा निर्णय मागे घेण्यास पालिका प्रशासनाला भाग पाडले होते. त्यानंतर शहरात प्रचंड पाणीसमस्या उद्भवली होती. यावर्षी सत्ताधारी भाजपाने अद्याप या निर्णयाला विरोध केला नसल्याने सर्वपक्षीय भाजपाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत.पनवेल शहराला ३० एमएलडी पाण्याची गरज दररोज भासत असते. मात्र, प्रत्यक्षात २० एमएलडी पाण्यावर पनवेलकरांना आपली तहान भागवावी लागते. पालिका दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेत असेल, तर नागरिकांमध्येही या बाबत प्रचंड नाराजी आहे.विशेष म्हणजे, पनवेल परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. मात्र, आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणाची साठवणूक क्षमता गाळामुळे अपुरी असल्याने पाण्याचा अपव्ययच होत असल्याने पनवेलकरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. पालिका हद्दीतील २९ गावांमध्ये देखील पाण्याची समस्या गंभीर आहे.शहरी भागासह ग्रामीण भागात देखील पाणीपुरवठ्याबाबत पालिकेला ठोस उपाययोजना राबवावी लागणार आहे. विशेष म्हणजे, आगामी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पाणीपुरवठ्याचा विषय चांगलाच गाजणार आहे. भाजपाने महापालिकेच्या स्थापनेपूर्वी दिलेल्या २४ तास पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधक वारंवार उपस्थित करत आहेत. पालिकेच्या महासभेतही हा विषय चांगलाच गाजणार आहे.पनवेल शहराला मुबलक पाणीपुरवठा कसा करता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. एमआयडीसी व एमजेपीकडे तशा प्रकारची बोलणीदेखील सुरू आहेत. अमृत योजनेअंतर्गत २० एमएलडी पाण्याची तरतूद आहे. ज्या तरतुदीची अंमलबजावणी करता येणार आहे का? याची चाचपणीही सुरू आहे.- विक्रांत पाटील, उपमहापौरपालिकेमार्फत उद्भवलेल्या या समस्येला सत्ताधारी जबाबदार आहेत. या संदर्भात ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. महासभेत या संदर्भात मुद्दा उपस्थित करणार आहोत.- सतीश पाटील, नगरसेवक, रायगड जिल्हाध्यक्षदिवासाआड पाणीपुरवठा हा काय तोडगा असू शकत नाही. पाणीचोरी, टँकर लॉबी यांच्याविरोधात पालिकेने सर्वप्रथम कठोर कारवाई करावी. प्रत्येक वेळेला नागरिकांना वेठीस धरले जात असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध करू, पालिकेने हे निर्णय त्वरित मागे घ्यावेत.- रामदास शेवाळे, शिवसेना महानगरप्रमुख, पनवेलदिवसाआड पाणीपुरवठा भाजपाचे अपयश आहे. हा निर्णय घेण्याऐवजी पालिकेने पाण्याचे इतर स्रोत जिवंत करावेत. पालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने विहीर, तलाव आहेत. त्या पाण्याला कशाप्रकारे वापरात आणता येईल, या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.- हरेश केणी, नगरसेवक, शेकाप

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीटंचाईpanvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका