पनवेल तालुक्याला मुलगी नकोशी

By Admin | Updated: February 12, 2016 03:32 IST2016-02-12T03:32:14+5:302016-02-12T03:32:14+5:30

दक्षिण नवी मुंबई हे देशातील पहिले स्मार्ट शहर करण्याची घोषणा सिडकोने केली आहे. उच्चशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या या परिसरातील रहिवाशांनाही मुलगी नकोशी

In Panvel taluka, the girl does not want Nushi | पनवेल तालुक्याला मुलगी नकोशी

पनवेल तालुक्याला मुलगी नकोशी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
दक्षिण नवी मुंबई हे देशातील पहिले स्मार्ट शहर करण्याची घोषणा सिडकोने केली आहे. उच्चशिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र असणाऱ्या या परिसरातील रहिवाशांनाही मुलगी नकोशी झाल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. पनवेल तालुक्यामधील सिडको क्षेत्रामध्ये मुलींचा जन्मप्रमाण फक्त ८२० आहे. देशातील सर्वात कमी जन्मदर असलेल्या पहिल्या शहरांमध्ये पनवेलचा ८ वा क्रमांक असून, ही चिंताजनक गोष्ट आहे.
सिडको पनवेल तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधले जात आहे. मेट्रो व इतर महत्त्वाच्या प्रकल्पामुळे या परिसराची चर्चा देशभर सुरू आहे. केंद्र शासनाने स्मार्ट सिटी स्पर्धेची घोषणा करताच, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये साउथ नवी मुंबई ही देशातील पहिली स्मार्ट सिटी होणार असल्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत या परिसरात ५० हजार कोटी रुपयांची गुुंतवणूक होणार असून, त्यामधील ३८ हजार कोटी सिडको स्वत: गुंतविणार आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले जात असले, तरी प्रत्यक्षात या परिसराची स्थिती बिकट आहे. गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या, तरी विचारांमध्ये स्मार्टपणा आलेला नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील सुनियोजित परिसरामधील रहिवाशांना मुलगी नकोशी झाली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेमध्ये पनवेल तालुक्यामधील सिडको कार्यक्षेत्रामधील लोकसंख्या १ लाख ९५ हजार २७३ एवढी आहे. साक्षरतेचे प्रमाण ८०.१० असे समाधानकारक असले, तरी एक हजार मुलांच्या तुलनेमध्ये मुलींचा जन्मप्रमाण ८२० एवढा कमी आहे. महाराष्ट्र राज्याचा सरासरी जन्मदर ९२९ व रायगड जिल्ह्याचा ९५९ असताना, सुनियोजित शहरात एवढा कमी जन्मदर का, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. देशात केरळमधील सहा जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर १ हजारपेक्षा जास्त आहे.

रायगड जिल्ह्यामधील इतर तालुके व पनवेल नगरपालिका क्षेत्रामधील मुलींचा जन्मप्रमाणही समाधानकारक आहे. सिडको क्षेत्रामध्ये हा फरक का, असा प्रश्न पडत आहे. प्रशासनाने याविषयी गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

‘बेटी बचाव’ जनजागृतीची गरज
पनवेल तालुक्यामधील सिडको कार्यक्षेत्रामध्ये मुलींचा जन्मदर चिंताजनक आहे. या विभागात पुरुषांच्या साक्षरतेचे प्रमाण जवळपास ९६ टक्के व महिलांचे साक्षरतेचे प्रमाणे ९१ टक्के आहे. सुशिक्षित नागरिकांची संख्या जास्त असतानाही मुलींचा जन्मदर घसरत चालला आहे. सिडको, जिल्हा परिषद, सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी या सर्वांनी एकत्र येऊन ‘बेटी बचाव’ अभियान राबविण्याची गरज आहे. या परिसरात गर्भलिंग निदान चाचण्या करून दिल्या जात असल्यास, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. नियमाप्रमाणे सर्व सोनोग्राफी सेंटरर्सचे काम होते का, याची तपासणी करण्याची मागणी दक्ष नागरिक करू लागले आहेत.

पनवेल शहरातील स्थिती समाधानकारक
पनवेल तालुक्यामधील सिडको कार्यक्षेत्रामध्ये मुलींचा जन्मदर ८२० एवढा कमी असला, तरी पनवेल नगरपालिका क्षेत्रातील स्थिती काही प्रमाणात समाधानकारक आहे. या परिसरात साक्षरतेचे प्रमाण सरासरी ९३ टक्के असून, मुलींचा जन्मदर ९४६ आहे. एकूण रायगड जिल्ह्याच्या जन्मदरापेक्षा हे प्रमाणही कमी आहे. जिल्ह्यात हे प्रमाण ९५९ एवढे आहे. पनवेल शहर व सिडको क्षेत्र यामध्ये तब्बल १२६ चा फरक आहे.

सिडको पनवेल परिसरातील लोकसंख्येचा तपशील
शहरराज्यजन्मदर
भिवंडीमहाराष्ट्र७०९
दिल्ली कॅन्टोन्मेंटदिल्ली७३१
वापीगुजरात७३९
सुरतगुजीरत७५६
भिवाडीराजस्थान७५७
पिथमपूरमध्यप्रदेश७९६
शिमलाहिमाचल प्रदेश८२०
सिडको पनवेल परिसरमहाराष्ट्र ८२०
नोएडाउत्तरप्रदेश८२४

Web Title: In Panvel taluka, the girl does not want Nushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.