शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Panvel: व्यावसायिक मालमत्ता कर धारकापाठोपाठ औद्योगिक मालमत्ता धारकांना पनवेल मनपाच्या नोटिसा, कर वसुलीसाठी पालिकेची मोहीम तीव्र 

By वैभव गायकर | Updated: March 20, 2023 17:44 IST

Panvel News: सिडको हद्दीतील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 1398 मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा  एमआयडीसी क्षेत्रातील  अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत.

- वैभव गायकर पनवेल - सिडको हद्दीतील अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 1398 मालमत्ताधारकांबरोबरच तळोजा  एमआयडीसी क्षेत्रातील  अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत. आयुक्त  गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने व्यवसायिक मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सुरु केली आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सुमारे 100 उद्योजक मालमत्ता धारकांना मालमत्ता कराच्या वसुलीसाठी पनवेल महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत. एमआयडीसीमधील एकुण 10 हजार 25 मालमत्ताधारकांपैकी अधिक मालमत्ता कर थकवलेल्या 100 मालमत्तांधारकांना या नोटीसा देण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी  व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने 8 टिम केल्या आहेत. प्रभाग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या टिम सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात आहे.

याचबरोबरीने मालमत्ता कर उपायुक्त गणेश शेटेही या टिमसोबत प्रत्यक्ष वसुलीच्या कामामध्ये सहभागी होत आहे. याचबरोबर  मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त  हरिश्चंद्र कडू यांनी दिलेल्या माहितीनूसार चारही प्रभागामंध्ये मार्च महिना संपेपर्यंत नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार ,रविवार कार्यालये सुरू राहणार आहेत. जप्तीची कार्यवाही सुरू केल्यापासून  11 दिवसात साडे नऊ कोटींचा भरणा महापालिकेकडे जमा झालेला आहे.

मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा 2 टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

टॅग्स :panvelपनवेलTaxकर