पनवेल महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये

By Admin | Updated: October 11, 2016 03:46 IST2016-10-11T03:46:07+5:302016-10-11T03:46:07+5:30

रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून १ आॅक्टोबरपासून पनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात आली आहे.

Panvel Municipal Elections in February-March | पनवेल महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये

पनवेल महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये

तळोजा : रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका म्हणून १ आॅक्टोबरपासून पनवेल शहर महानगरपालिका अस्तित्वात आली आहे. पालिकेच्या स्थापनेनंतर नवनिर्वाचित आयुक्त सुधाकर शिंदे यांनी पालिकेच्या कामकाजाला सुरुवात आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. साधारण फेब्रुवारी-मार्चमध्ये पनवेल महापालिका निवडणुका होणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे.
पनवेल महानगरपालिकेसाठी सुमारे ७७ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. मात्र प्रभाग रचना कशी असेल? किती प्रभाग असतील, याचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे.
महानगरपालिकेला हिरवा कंदील मिळाल्यानंतर पनवेल शहरासह तालुक्यातील अनेकजण नगरसेवक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. नवरात्रौत्सवात त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघरमधील विविध पक्षांच्या संपर्क कार्यालयातही चर्चा होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Panvel Municipal Elections in February-March