आपत्कालीन आराखड्याचा विषय सर्वसाधारण सभेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:52 IST2017-07-27T01:52:42+5:302017-07-27T01:52:52+5:30

पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल आदिंसह २९ गावांचा समावेश आहे.

Panvel Municipal Corporation news | आपत्कालीन आराखड्याचा विषय सर्वसाधारण सभेत?

आपत्कालीन आराखड्याचा विषय सर्वसाधारण सभेत?

पनवेल: पनवेल महापालिकेची स्थापना झाली. पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा वसाहत, नवीन पनवेल आदिंसह २९ गावांचा समावेश आहे. पालिकेची व्याप्ती मोठी असल्याने आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी पालिकेचा सक्षम असा आपत्कालीन आराखडा तयार करणे गरजेचे असताना पालिकेने पनवेल नगरपरिषदेचा आराखडा कॉपी करुन त्या आराखड्याला पनवेल महानगरपालिकेचा आपत्कालीन आराखडा नाव दिल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात लोकमतने दि. २६ रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर पालिका क्षेत्रातील रहिवाशांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
आपत्कालीन परिस्थितीशी दोन हात करण्याच्या दृष्टीने संपूर्ण पालिका क्षेत्राचा सर्वसमावेश आराखडा पालिकेने तयार करणे गरजेचे असताना पालिकेचा आराखडा केवळ पनवेल शहरापुरताच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात येथील रहिवासी, लोकप्रतिनिधींना याबाबत नाराजी व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया मांडल्या.


आपत्कालीन आराखड्यासंदर्भात सर्वप्रथम माहिती घेतली जाईल, त्यानंतरच यासंदर्भात प्रतिक्रिया देणे उचित ठरेल.
- डॉ. कविता चौतमोल,
महापौर, पनवेल महानगरपालिका

पनवेल महानगर पालिकेचे मनुष्यबळ देखील अपुरे आहे. अद्याप महापौर, उपमहापौर, विरोधकांना बसायला जागा नाही. पालिकेने आपत्कालीन आराखडा तयार करणे गरजेचे आहे. याकरिता पालिकेने पावले उचलली नसतील. सर्वसाधारण सभेत हा विषय आम्ही नक्कीच मांडू.
- प्रीतम म्हात्रे,
गटनेते शेकाप

आपत्कालीन आराखड्यात पनवेल शहर वगळता पालिकेत समाविष्ट असलेला ग्रामीण भाग, खारघर तसेच तळोजा औद्योगिक सारख्या महत्त्वाच्या परिसराचा काहीच विचार केला गेला नसल्याने हा आराखडाच हास्यास्पद आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणून पनवेलची निर्मिती करीत असताना अशाप्रकारच्या चुका पालिका प्रशासनाला शोभणाºया नाहीत.
- गुरुनाथ गायकर,
नगरसेवक, शेकाप

पनवेल पालिका क्षेत्रात कधीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. मात्र पालिका याकरिता सक्षम नसल्याचे या आराखड्यावरुन सिध्द झाले आहे. त्यामुळे अशाप्रकारचे उदासीन धोरण पालिका राबवत असेल तर पालिका क्षेत्रातील रहिवाशांच्या जीवाला आपत्कालीन परिस्थितीला धोका निर्माण होवू शकतो.
- संतोष तांबोळी,
रहिवासी खारघर

Web Title: Panvel Municipal Corporation news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.