CoronaVirus News: कोरोनावर मात करून कामावर रूजू झालेल्या अधिकाऱ्याचे आयुक्तांकडून स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:08 IST2020-07-14T21:07:36+5:302020-07-14T21:08:45+5:30

CoronaVirus News: कोरोनावर मात करताच कार्यालय गाठणाऱ्या अधिकाऱ्याचे आयुक्तांकडून कौतुक

panvel municipal Commissioner welcomes engineer who joins duty by defeating coronavirus | CoronaVirus News: कोरोनावर मात करून कामावर रूजू झालेल्या अधिकाऱ्याचे आयुक्तांकडून स्वागत

CoronaVirus News: कोरोनावर मात करून कामावर रूजू झालेल्या अधिकाऱ्याचे आयुक्तांकडून स्वागत

पनवेल: अत्यंत कमी मनुष्यबळात कोरोनावर मात करण्यासाठी पालिका प्रशासन मागील तीन महिने युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारे अनेक कर्मचारी व अधिकारी कोरोनाने बाधित झाले. यापैकी विद्युत अभियंता प्रीतम पाटील यांनी कोरोना वर मात करून पुन्हा एकदा पालिकेच्या सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे कोरोनाच्या भीतीने विविध कारणे पुढे करून दांडी मारणाऱ्या कर्मचारी वर्गासमोर प्रीतम पाटील यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. तीन आठवड्यांपूर्वी पाटील यांना कोरोनाची बाधा झाली.यावेळी कोरोनाबाधित असतानादेखील प्रीतम पाटील यांनी पालिकेच्या विलगीकरण केंद्रात बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा तयार करण्याचे काम घरातून पूर्ण केले. यावेळी कोरोनाने जास्त त्रास जाणवल्याने त्यांनी उपजिल्हा रुग्णलयात उपचार घेतले. विशेष म्हणजे कोरोनामुक्त होताच त्वरित आपले कर्तव्य पार पाडत कामावर रुजू झाले. प्रीतम पाटील यांच्या या कर्तव्यदक्षपणाचे कौतुक करत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले आहे. 
 

Web Title: panvel municipal Commissioner welcomes engineer who joins duty by defeating coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.