पनवेलमध्ये मनसे स्वबळावर
By Admin | Updated: April 28, 2017 00:40 IST2017-04-28T00:40:29+5:302017-04-28T00:40:29+5:30
पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील उतरणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत

पनवेलमध्ये मनसे स्वबळावर
पनवेल : पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील उतरणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत गोखले हॉल येथे बुधवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच काही दिवसांतच पक्षाकडून उमेदवारी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र . १८ चे उमेदवार यतिन विनायक देशमुख यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करून मोठ्या संख्येने यश संपादन करेल असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त के ला. यावेळी जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील आदी उपस्थित
दरम्यान, या निवडणुकीत मनसे कोणाची मते खाईल, याकडे जाणगारांचे लक्ष लागले आहे. पनवेल परिसरात संघटना कमकुवत आहे. अशात थेट महापालिका निवडणुकीत उडी घेण्याची तयारी सुरू केल्याने याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. होते. (वार्ताहर)