पनवेल आयुक्तांनी कारखानदारांना सुनावले

By Admin | Updated: July 7, 2017 06:43 IST2017-07-07T06:43:04+5:302017-07-07T06:43:04+5:30

पनवेल महापालिकेला एलबीटी भरण्यास तळोजा एमआयएडीसीमधील कारखानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात विविध

The Panvel Commissioner told the factories | पनवेल आयुक्तांनी कारखानदारांना सुनावले

पनवेल आयुक्तांनी कारखानदारांना सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेला एलबीटी भरण्यास तळोजा एमआयएडीसीमधील कारखानदारांनी विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात विविध उपाययोजना कारखानदार करीत आहेत. राज्य सरकारच्या प्रतिनिधीबरोबर झालेल्या बैठकीनंतर गुरुवारी पनवेल महापालिकेत आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत कारखानदारांची बैठक पार पडली. एलबीटीमध्ये सवलत देण्याच्या संदर्भात कारखानदारांनी विनंती केल्यानंतर राहिलेली थकबाकी लवकरात लवकर भरा, अन्यथा व्याजासह पालिका थकबाकी वसूल करेल, अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत दिल्या. या वेळी तीसपेक्षा जास्त कारखानदार बैठकीला उपस्थित होते.
पनवेल महापालिकेअंतर्गत येणाऱ्या तळोजा एमआयडीसीमधील कारखानदारांनी एलबीटी (लोकल बॉडी टॅक्स) भरण्यास विरोध दर्शविला आहे. यामुळे जवळजवळ १०० कोटी रुपयांचा पालिकेचा महसूल बुडत आहे. यासंदर्भात कारखानदारांनी आपली बाजू आयुक्तांसमोर मांडली. करामध्ये सवलत द्यावी, याकरिता विनंती केल्यानंतर आयुक्तांनी कारखानदारांना चांगलेच सुनावले.

Web Title: The Panvel Commissioner told the factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.